सांगली : सांगली जिल्हा कारागृहात सुरू केलेल्या राज्यातील पहिल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवेला शुक्रवारी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. जिल्हा कारागृहात जिल्हा नियोजन समितीमधून नावीण्यपूर्ण उपक्रमांतर्गत २४ लाख रुपये खर्चून ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कोर्ट’ (व्ही.सी. कोर्ट) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे न्यायालय आणि कारागृह व्हि.सी. सुविधेने जोडण्यात आली आहेत. यामुळे कैद्यांना आता कोर्टात नेण्या-आणण्याचा त्रास कमी होणार असून, व्ही.सी. द्वारेच कामकाज केले जाणार आहे. यासाठी सत्र न्यायालयामध्ये चार आणि कारागृहामध्ये चार व्ही.सी. युनिट निर्माण करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा सुरु
By admin | Updated: August 17, 2014 00:44 IST