शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

पशुवैद्यकीय रुग्णालये आता सलग सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

सांगली : पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी जनावरांच्या रुग्णालयाच्या वेळा बदलण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश सोमवारी जारी करण्यात ...

सांगली : पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी जनावरांच्या रुग्णालयाच्या वेळा बदलण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश सोमवारी जारी करण्यात आला.

नव्या निर्णयानुसार सोमवार ते शुक्रवार यादिवशी पशुवैद्यकीय रुग्णालये सकाळी ९ ते दुपारी ४.३० या वेळेत सलग सुरू राहतील. दुपारी एक ते दीड जेवणाची सुट्टी राहील. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत कामकाज सुरु राहील. आकस्मिकप्रसंगी २४ तास सेवा सुरु राहील, असेही स्पष्ट केले आहे. तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व रुग्णालयांसह फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांनाही नव्या वेळा लागू राहतील.

यापूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत कामकाज चालायचे. हिवाळ्यात सकाळी ८ ते दुपारी १ आणि त्यानंतर ३ ते सायंकाळी ५ या वेळेत उपचार मिळायचे. मधील वेळेत रुग्णालये बंद असल्याने पशुपालकांची गैरसोय व्हायची. जनावरे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना थांबावे लागायचे. डॉक्टर व कर्मचारीही दिवसभर अडकून पडायचे. उपचारांव्यतिरिक्त बाहेरील कार्यालयीन कामांना वेळ मिळायचा नाही. आता सलग रुग्णालय सुरू राहिल्याने पशुपालक व डॉक्टरांचीही सोय झाली आहे. कार्यालय व रुग्णालयाची वेळ सुसंगत झाली आहे.