शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासाच्यादृष्टीने अत्यंत चांगले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:20 IST

सांगली : गावाच्या विकासासाठी चिकाटीने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य काम करीत असतात. त्यांच्या कामाची नोंद घेतली पाहिजे. ‘लोकमत’ने सरपंचांचा गौरव करून ग्रामविकासासाठी राबणाºयांना सन्मान मिळवून दिला आहे. या पुरस्कारातून सरपंचांना निश्चित पे्ररणा मिळेल. ग्रामविकासाच्यादृष्टीने हे अत्यंत चांगले पाऊल आहे, असे मत पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव नाईक ...

सांगली : गावाच्या विकासासाठी चिकाटीने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य काम करीत असतात. त्यांच्या कामाची नोंद घेतली पाहिजे. ‘लोकमत’ने सरपंचांचा गौरव करून ग्रामविकासासाठी राबणाºयांना सन्मान मिळवून दिला आहे. या पुरस्कारातून सरपंचांना निश्चित पे्ररणा मिळेल. ग्रामविकासाच्यादृष्टीने हे अत्यंत चांगले पाऊल आहे, असे मत पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष तथा आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’चा सोहळा सांगलीत थाटात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाईक बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यात कृष्णाकाठावरील गावे सधन आहेत, तर पूर्वेला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. अशा विचित्र परिस्थितीतही प्रत्येक गावातील सरपंच विकासासाठी अहोरात्र कार्यरत असतो. त्यांच्या कार्याची नोंद घेण्याची गरज होती. ती ‘लोकमत’च्या माध्यमातून पूर्ण झाली. आज ५० टक्के महिला सरपंच आहेत. चूल व मूल ही परिस्थितीही बदलली आहे. अनेक महिला सरपंच पुरूषांपेक्षा चांगले काम करीत आहेत. थेट सरपंच निवडीमुळे चांगल्या व्यक्ती, महिलेला संधी मिळाली आहे.गावाचा विकास ठराविक साच्यातून होत होता. रस्ते, गटारी या कामांना शासनाकडून निधी मिळतच राहील, पण या पायाभूत सुविधांपलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. गावातील नैसर्गिंक साधनसंपत्तीचा विचार करून नवीन उद्योगधंदे उभारले पाहिजेत. तरुणांच्या हाताला काम देण्याचा विचार झाला पाहिजे. शेतीवरील बोजाही कमी करण्याची गरज असल्याचे आ. नाईक यांनी सांगितले.गावाचे दारिद्र्य संपवागावाचा विकास म्हटले की, पाणी, रस्ते, शाळांच्या खोल्या बांधणे, मागासवर्गीय भागात काँक्रिटीकरण करणे, समाजमंदिरे बांधणे इतकाच विचार होतो. त्यापुढे जाऊन ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे की नाही? पायाभूत सुविधा निर्माण होतील. त्यासाठी शासन निधीही देईल. पण गावातील तरुणांना रोजगार दिला पाहिजे. हाताला काम देऊन दारिद्र्य संपविले पाहिजे, असे आ. नाईक यांनी सांगितले.