लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून शिराळा उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेले आय. सी. यू. व्हेंटिलेटर युनिट कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांनी व्यक्त केले.
येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर युनिट प्रदान कार्यक्रमावेळी सुखदेव पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अभिजीत पाटील, नंदकिशोर नीळकंठ, तालुकाप्रमुख संतोष हिरुगडे, सागर मलगुंडे उपस्थित होते.
सुखदेव पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीपोटी दिलेले व्हेंटिलेटर युनिट उपयुक्त ठरणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाची खरी गरज ओळखून खासदार माने यांनी उपलब्ध करून दिलेल्या या युनिटमुळे अनेक जीव वाचविण्यासाठी मदत होणार आहे. लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभाग यांच्यात चांगला समन्वय असल्याचा फायदा रुग्णांना होत आहे.
यावेळी रणजितसिंह नाईक, नगरसेवक बंडा डांगे, केदार नलवडे, स्वप्नील निकम, नीलेश आवटे, पृथ्वीसिंग नाईक, प्रतापसिंह चव्हाण, प्रदीप कदम, राजेंद्र पाटील, मोहन पाटील, तानाजी पाटील, धनाजी पाटील, महादेव माने, राम जाधव, अभी नलवडे, प्रतीक हसबनीस, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. विनायक धस यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*