शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

परवान्यासाठी भाजी विक्रेत्यांचा महापालिकेवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:26 IST

२१ महापालिका १० सांगलीत भाजी विक्रेत्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महापालिकेवर हल्लाबोल केला. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...

२१ महापालिका १०

सांगलीत भाजी विक्रेत्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महापालिकेवर हल्लाबोल केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : उपयोगकर्ता कर महापालिका क्षेत्रातून हद्दपार करावा आणि २७०० भाजी विक्रेत्यांचे रखडलेले परवाने त्वरित द्यावेत, यासाठी जनसेवा फळे, भाजीपाला व खाद्यपेय विक्रेता संघटनेने सोमवारी महापालिकेवर हल्लाबोल केला. प्रवेशदारात ठिय्या मारत मुख्यालयास टाळे ठोकले. परवाने मिळाल्याविना माघार नाही, अशी आक्रमक भूमिका संघटनेचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी घेतली. मदनभाऊ युवा मंच व शिवसेनेने आंदोलनास पाठिंबा दिला.

दुपारी स्टेशन चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. प्रशासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महापालिकेसमोर मोर्चा आला, तरी चर्चेसाठी कोणीही पुढे आले नाही, त्यामुळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी मुख्यालयास टाळे ठोकले. दारातच ठिय्या मारला. त्यानंतर दिवसभर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू ठेवली.

संध्याकाळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलाविले. चर्चेदरम्यान शंभोराज काटकर यांनी आक्रमक भूमिका घेत आजच परवाने देण्याची मागणी केली. आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित नसल्याने परवाने देणे शक्‍य नव्हते, त्यामुळे पदाधिकारी आक्रमक झाले. रात्री त्यांनी उपोषण सुरू केले. रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नव्हता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले की, आंदोलकांच्या भूमिकेला शिवसेनेचा पाठिंबा आहे. यासाठी नगरविकास मंत्र्यांकडे दाद मागणार आहोत. आंदोलनात इलियास पखाली, कैस अलगूर, लताताई कांबळे, अजित राजोबा, मुजीब वागवान, सागर घोडके, संजय शिंदे, राजू नरळे, संदीप ढोले, संदीप साळे, भरत वीरकर, विजय बाबर, प्रशांत शिकलगार, नबी शेख, चेतन चव्हाण, तुळसाबाई कलाल, सखूबाई मासाळ, रेणुका पुजारी, विकास सूर्यवंशी यांच्यासह विक्रेते सहभागी होते.

चौकट

शंभोराज काटकर म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये आठ महिने व्यवसाय बंद होता, तरीही ९०० रुपयांचा अवाजवी उपयोगकर्ता कर घेतला जात आहे. गेल्यावर्षी नोंदणी केलेल्या विक्रेत्यांना विनाअट परवाने देण्याची मागणी आहे. बाजार कर कमी करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. याची कसलीही दखल प्रशासनाने घेतलेली नाही.

----------