शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’ची ऊसतोड रोखली

By admin | Updated: October 15, 2015 00:27 IST

गळिताच्या प्रारंभीच खळबळ : ब्रह्मनाळ येथे ‘स्वाभिमानी’चा दणका

भिलवडी : एफआरपीनुसार उसाला हमीभाव जाहीर न करता ऊसतोड सुरू करणाऱ्या सांगली येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेने ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे सुरू केलेली ऊसतोड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्यासह कार्यकर्त्यांनी बंद पाडली.बुधवारी सकाळी सांगली येथे वसंतदादा कारखान्याने गळिताचा प्रारंभ केला. मात्र याचदिवशी स्वाभिमानीने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व पलूस तालुका पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी वसंतदादा कारखान्याने गेल्या दोन गळित हंगामातील शेतकऱ्यांची थकित ऊसबिले दिल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटवून देणार नसल्याचा इशारा दिला होता. यावेळी वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, भिलवडी, अंकलखोप आदी गावातील शेतकऱ्यांचे कारखाना प्रशासन कोट्यवधी रुपयांची देणीबाकी आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्यावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी कारखाना प्रशासनाने यंदाच्या हंगामापुरते सहकार्य करा, आम्ही मागची बिले देतो, असे आश्वासनही दिले होते.मात्र बुधवारी कारखान्याच्या गळित हंगामाचा प्रारंभ सुरू करीत असतानाच प्रशासनाला शेतकऱ्यांची बिले देण्याचा विसर पडला. पलूस तालुक्यात कारखान्याने ब्रह्मनाळ येथे ऊसतोड सुरू केली. एका शेतकऱ्यास कारखान्याचे कर्मचारी व ऊस वाहतूकदारांनी ‘तुम्ही आम्हास आता सहकार्य करा, आम्ही एफआरपीनुसार तुम्हाला दर देतो,’ असे सांगून बुधवारी सकाळी ऊसतोड सुरू केली. ही माहिती स्वाभिमानीच्या संदीप राजोबा यांना समजताच त्यांनी शेतात समक्ष जाऊन ऊसतोड रोखली. (वार्ताहर)बिल द्या : अन्यथा कांडेही देणार नाही...वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडून गेल्या दोन हंगामापासून ऊसबिले थकित आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे देण्यास टाळाटाळ होत आहे. कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांची गेल्या दोन गळीत हंगामातील थकित बिले दिल्याशिवाय वसंतदादा कारखान्याला उसाचे कांडेही देणार नसल्याचा इशारा संदीप राजोबा यांनी दिला आहे.