शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

वसंतदादा बॅँकेचे मुख्यालय विकणार : प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:38 IST

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या मुख्यालयाच्या इमारतीसह मुंबईतील इमारतही लिलावात काढण्यासाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सहकार विभागाकडून मंजुरी मिळताच दोन्ही इमारतींच्या विक्रीची प्र्रक्रिया तातडीने

ठळक मुद्देअन्य मालमत्तांचाही लिलाव सुरू

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या मुख्यालयाच्या इमारतीसह मुंबईतील इमारतही लिलावात काढण्यासाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सहकार विभागाकडून मंजुरी मिळताच दोन्ही इमारतींच्या विक्रीची प्र्रक्रिया तातडीने सुरू होणार आहे.

बॅँकेची सांगली-मिरज रस्त्यावर भव्य व काचेची मोठी इमारत आहे. आकर्षक रंगसंगतीत रंगलेली आलिशान कार्यालये, वतानुकूलित यंत्रणा, लिफ्ट अशा सर्व सेवासुविधांनीयुक्त अशी ही बॅँक अन्य खासगी बॅँकांच्या तुलनेत सर्वात चर्चेत होती. अमर्याद व असुरक्षित कर्जवाटपाने बॅँकेला अधोगतीचा मार्ग दाखविला. कोट्यवधी रुपयांची कर्जे थकीत झाली. आर्थिक ताळमेळ बिघडल्यानंतर अखेर ही बॅँक अवसायनात काढण्यात आली. रिझर्व्ह बॅँकेमार्फत वसंतदादा बॅँकेचा परवानाही निलंबित करण्यात आला. त्यानंतर मुख्यालयाच्या इमारतीतही निराशेचे वारे वाहू लागले. चारशेहून अधिक कर्मचारी असलेल्या या बॅँकेतील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कर्मचारी कपात होत होत आता इतक्या मोठ्या इमारतीमध्ये केवळ २२ कर्मचारीच काम करीत आहेत. राज्यातील एकूण शाखांचा विचार केला, तर सध्या केवळ २८ जणांचाच स्टाफ आहे. सांगलीच्या मुख्यालयाची घरपट्टी, विद्युत बिले व अन्य खर्च करणेही जिकिरीचे होत असून, कर्मचारी वर्गही अत्यंत कमी झाल्याने मुख्यालय विक्रीचा प्रस्ताव तयार होऊन तो मंजुरीसाठी आता सहकार विभागाकडे गेला आहे.

वसंतदादा बॅँकेच्या राज्यात एकूण १० मालकीच्या इमारती आहेत. यातील आठ मालमत्तांचा लिलाव अवसायकांमार्फत काढण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात याची प्रक्रिया राबविण्यात आली. बॅँकेच्या वखारभाग धर्मरत्न कॉम्प्लेक्स, वखारभाग गांधी बिल्डिंग, सराफ कट्टा, मार्केट यार्ड या सांगलीतील इमारतींसह मिरजेतील स्टेशन रोड व लक्ष्मी मार्केटमधील दोन इमारतीसह अंकलखोप (ता. पलूस) व चिंचणी (ता. तासगाव) येथील इमारतींचा या लिलाव प्रक्रियेत समावेश होता. सांगली मार्केट यार्डातील लिलाव प्रक्रियेस मार्केट कमिटीच्या संचालकांनी हरकत घेतल्याने ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. अन्य इमारतींपैकी वखारभागातील दोन, सराफ कट्टा व मिरजेतील स्टेशन रोडच्या इमारतीसाठी एकही निविदा दाखल झाली नव्हती. मिरजेच्या लक्ष्मी मार्केटजवळील बॅँक इमारतीसाठी एक निविदा दाखल झाली होती, मात्र ती वाजवी किमतीपेक्षा कमी असल्याने ती प्रक्रिया रद्द केली होती. अंकलखोप आणि चिंचणी येथील लिलाव व बोलीची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांची विक्री झालेली आहे. आता उर्वरीत इमारतींसाठी फेरनिविदा शक्य आहे.अंकलखोपची इमारत : जिल्हा बॅँकेकडेआठ इमारतींपैकी अंकलखोप आणि चिंचणी शाखांच्या इमारतींची विक्री झाली आहे. चिंचणी येथील इमारतीला बाजारमूल्यापेक्षा थोडासा जास्त दर मिळाला, मात्र अंकलखोपच्या विक्री व्यवहारात बॅँकेला मोठा लाभ झाला. २७ लाख ६० हजार इतके मूल्य निश्चित केले असताना या इमारतीस ५0 लाख ४० हजार रुपये मिळाले. जिल्हा बॅँकेने ही इमारत लिलावात खरेदी केली.बॅँकेची आर्थिक स्थितीबॅँकेची सध्या थकीत कर्जे १५९ कोटी ४५ लाख इतकी असून, ठेवींची रक्कम १५८ कोटींच्या घरात आहे. म्हणजेच येणी आणि देणी जवळपास समान आहेत. २६ फेब्रुवारी रोजी एकरकमी परतफेड योजनेची मुदत संपली असून, त्याबाबतची माहितीही सहकार विभागाला कळविण्यात आली आहे.