शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा शेतकरी बँकेची स्थगिती दोघांपुरतीच

By admin | Updated: October 8, 2015 00:59 IST

चौकशी सुरूच : पुढील सुनावणी १६ आॅक्टोबर रोजी; चौकशी अधिकाऱ्यांसमोर १०५ जणांचे म्हणणे सादर

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या १७० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी बुधवारी सुनावणीची प्रक्रिया पार पाडली. सहकार विभागाने दिलेली स्थगिती ही केवळ दोघा याचिकाकर्त्यांपुरतीच असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. त्यामुळे कलम ७२ (२) ची चौकशी सुरू ठेवण्यात आली आहे. चौकशी अधिकाऱ्यांसमोर आजअखेर १०५ जणांनी म्हणणे सादर केले आहे. दोघांचे म्हणणे अद्याप सादर व्हायचे आहे. दोन मृत संचालकांचे वारसदार शोधून त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यांना सुनावणीची शेवटची संधी देण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात युक्तिवादास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. युक्तिवाद संपल्यानंतर आरोपपत्राची तयारी चौकशी अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. त्यामुळे ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या १७० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. चौकशीचे कामकाज अंतिम टप्प्यात असतानाच तत्कालीन सरव्यवस्थापक माधव गोगटे आणि मनोहर कावेरी यांनी चौकशी अधिकाऱ्यांच्या काही आदेशांविरोधात सहकारमंत्र्यांकडे अपील केले. कायद्यातील तरतुदीनुसार ज्यांना आरोपी केले आहे, अशा सर्वांना चौकशीसंदर्भातील सर्व प्रकारची कागदपत्रे मोफत मिळायला हवीत. मात्र चौकशी अधिकारी यासाठी पैसे भरून घेत आहेत. याशिवाय बाहेर ५0 पैसे प्रति प्रत दर असताना, चौकशी अधिकारी १ रुपया दर आकारत आहेत, असे आक्षेप नोंदविण्यात आले. याशिवाय कोणत्याही निर्णयप्रक्रियेत नसलेल्या बँक कर्मचाऱ्यांना कोणत्याही घोटाळ्यात आरोपी करता येत नाही, असा एक औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचा दाखलाही सहकारमंत्र्यांसमोरील सुनावणीवेळी देण्यात आला होता. वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या अनेक नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी त्यास स्थगिती दिली होती.विद्यमान सहकारमंत्र्यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन यावरील स्थगिती उठविली. त्यानुसार चौकशीस सुरुवात झाली होती. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असताना, पुन्हा अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पुढील सुनावणी २८ रोजीदोघा माजी अधिकाऱ्यांनी सहकार विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर चौकशी अधिकाऱ्यांच्या आदेशांना व दोघांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. पुढील सुनावणी सहकारमंत्र्यांच्या दालनात २८ आॅक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.