शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा कारखाना, वॉलमार्टला सील

By admin | Updated: March 24, 2017 00:24 IST

महापालिकेची कारवाई : घरपट्टीच्या बड्या थकबाकीदारांवर आयुक्तांचा बडगा

सांगली : महापालिकेने गुरुवारी घरपट्टीच्या बड्या थकबाकीदारांविरोधात वसुलीची मोहीम उघडली. दिवसभरात वसंतदादा साखर कारखान्याच्या तीन कार्यालयांना, वॉलमार्ट, हॉटेल, फर्निचर दुकाने व वैयक्तिक मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी बड्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून, कोणत्याही स्थितीत ही मोहीम थांबणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. बड्या धेंडांवरील कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. राज्य शासनाने महापालिकेला थकीत कराची शंभर टक्के वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आयुक्त खेबूडकर यांनी दोन दिवसांपासून घरपट्टी, पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन कारवाईचे नियोजन केले. घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी आयुक्तांनी तीन पथके नियुक्त केली आहेत. या पथकांना जप्तीचे अधिकार देण्यात आले. महापालिकेची चालू व थकीत घरपट्टीची ७५ कोटी रुपयांची मागणी आहे. त्यापैकी आजअखेर ४० कोटी ७५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. अजूनही ३० कोटीची वसुली बाकी आहे. त्यापैकी किमान १५ कोटी रुपये मार्चअखेरपर्यंत वसूल करण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे. वॉरंट अधिकारी नितीनकाका शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अशोक मुळीक, सचिन पाटील, निखिल चोपडे, प्रकाश सर्जे, बंडू आंबी यांच्या पथकाने सकाळी कोल्हापूर रस्त्यावरील वॉलमार्टची इमारत सील केली. त्यांच्याकडे सव्वातीन लाखांची थकबाकी आहे. त्यानंतर ९ लाख ६७ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी प्रकाश अ‍ॅग्रोच्या इमारतीलाही सील ठोकण्यात आले. सायंकाळी वसंतदादा साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. वसंतदादा कारखान्याकडे १७ लाखाची थकबाकी आहे. कारखान्याने महापालिकेला करापोटी तीन धनादेश दिले होते. पण ते न वठल्याने गुरुवारी पथकाने कारखान्याच्या पर्चेस इमारत, जनरल इमारतीसह आणखी एका इमारतीला सील ठोकले. दिवसभरात पथकाने २५ थकबाकीदारांकडे वसुली केली. त्यापैकी दहाजणांनी तीन लाख रुपयांचा कर जमा केला आहे.काका हलवाई यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या पथकाने सीताराम लोंढे यांच्याकडील दोन लाख ९० हजाराच्या थकबाकीपोटी मालमत्ता जप्त केली. राजूभाई शेख यांची ८५ हजाराची थकबाकी होती. त्यांच्याकडे पथक कारवाईला गेले असता त्यांनी धनादेश दिला. हॉटेल अनुराधावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हॉटेल चालकांनी एक लाखाची रोकड व ७५ हजाराचा धनादेश दिला. हॉटेल डिलक्सकडून ६० हजार रुपयांची रोख रक्कम, तर १ लाख २० हजार रुपयांचे धनादेश जमा करण्यात आले. त्यामुळे जप्तीची कारवाई टळली. (प्रतिनिधी)