शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’ची निवडणूक बिनविरोध?

By admin | Updated: April 30, 2016 00:51 IST

सत्ताधाऱ्यांकडून चर्चा सुरू : ‘स्वाभिमानी’ला एक जागा मिळणार

सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे सर्वच अर्ज बाद झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेच्या प्रदीप पाटील गटाबरोबर सत्ताधाऱ्यांनी चर्चा सुरू केली आहे. दोन्ही गटाला प्रत्येकी एक जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही हालचाली सुरू आहेत. असे असले तरी, दि. १२ मे रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्याचदिवशी बिनविरोधचा अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत १८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत यातील ९0 उमेदवारी अर्ज बाद झाले. छाननी प्रक्रिया संपली, तेव्हा ७७ उमेदवारांचे ९२ अर्ज शिल्लक राहिल्याचे चित्र आहे. सत्ताधारी गटासह शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य बहुतांश इच्छुकांचे अर्ज बाद झाले. आरक्षित जागांवरील उमेदवारांना सलग तीन वर्षे ऊस पुरवठ्याचा नियम लागू नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले. उत्पादक गटातच सर्वाधिक उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यामुळे वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीचे चित्रच बदलून गेले आहे. या निवडणुकीत आता कोणाचेही पॅनेल होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. यामध्येही शेतकरी संघटनेतील फुटीर गट असलेल्या प्रदीप पाटील समर्थक सहा उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आरक्षित जागेवर संभाजी मेंढे यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे सर्वच अर्ज बाद ठरल्यामुळे वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकच राहिलेला नाही, असे चित्र आहे. सत्ताधाऱ्यांना निवडणूक बिनविरोध करणे सध्या खूपच सोपे झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रदीप पाटील गटाला एखादी जागा देण्याबाबत चर्चा आहे. परंतु, काहींनी त्यांना जागा देण्याबाबत विरोध केला आहे. निवडणूक बिनविरोधसाठी पाटील यांच्याशी सत्ताधाऱ्यांना चर्चा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)