शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

‘वसंतदादा’ला ३१ मेपर्यंत राख नियंत्रणासाठी मुदत

By admin | Updated: February 11, 2016 23:43 IST

बैठकीत तोडगा : द्यावे लागणार हमीपत्र

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याने राख नियंत्रण यंत्रणा ३१ मेपर्यंत कार्यान्वित करण्याचा निर्णय गुरुवारी सांगलीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कारखान्याकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाला हमीपत्रही दिले जाणार आहे. या मुदतीत कारखान्याने प्रदूषण बंद केले नाही, तर हरित न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हा सुधार समितीने दिला. जिल्हा सुधार समितीने वसंतदादा कारखान्याच्या प्रदूषणाविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन हाती घेतले आहे. समितीने हरित न्यायालयात जाण्याचा इशारा देताच प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्याला नोटीस बजावत २४ तासांत कारखाना बंद करण्याचे आदेश दिले होते. ऐन गळीत हंगामात कारखाना बंद ठेवण्याची वेळ आल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे गुरुवारी कारखान्याचे उपाध्यक्ष डी. के. पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड व सुधार समितीच्या सदस्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत कारखान्याच्यावतीने डी. के. पाटील यांनी भूमिका मांडली. गळीत हंगाम सुरू असताना कारखाना बंद ठेवल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कारखान्याकडून आवश्यक ती पावले उचलत आहोत. बॉयलरमधील वेट स्क्रबरची यंत्रणा बसविण्याचे काम एका कंपनीला दिले आहे. त्यापोटी ३० लाख रुपये दिले आहेत. या कामासाठी एक कोटीची गरज असून, कारखान्याने निधीची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, रवींद्र चव्हाण व इतर कार्यकर्ते प्रदूषण तातडीने थांबविण्यासाठी आग्रही होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी भड यांनी प्रदूषणाबाबत कडक भूमिका घेतली होती. अखेर बैठकीत कारखान्याला राख नियंत्रण करून प्रदूषण रोखण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली. वेट स्क्रबरसाठी स्वतंत्र बँक खाते काढून त्यावर ७० लाखांची रक्कम वर्ग करण्याची तयारी कारखान्याने दाखविली. कारखान्यातील मोठी मिल यंदाच्या हंगामात बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या मिलमधूनच गाळप होणार आहे. कारखान्याकडील बॉयलर क्रमांक ७ व ८ बंद ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित बॉयलरमधील वेट स्क्रबरची यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यासही कारखान्याने मान्यता दिली. ३१ मेपर्यंत प्रदूषण नियंत्रणाची यंत्रणा कार्यान्वित झाली नाही, तर हरित न्यायालयात जाण्याचा इशारा सुधार समितीच्या सदस्यांनी दिला. या बैठकीला कारखान्याच्यावतीने सचिव प्रकाश पाटील, संचालक शामराव नवले, बाळासाहेब पाटील, सुधार समितीचे प्रा. आर. बी. शिंदे, अ‍ॅड. राजाराम यमगर, रघुनाथ पाटील, अंकुश केरीपाळे, मुनीर मुल्ला, प्रवीण शिंदे उपस्थित होते. चौकटअसा निघाला तोडगावेट स्क्रबरपोटी ७० लाख रुपये स्वतंत्र खात्यावर वर्ग कारखान्याची मोठी मिल बंद, छोट्या मिलमधूनच गाळपबॉयलर क्रमांक ७ व ८ बंद करणे.उर्वरित बॉयलरमधील वेट स्क्रबर यंत्रणा कार्यान्वित करणे.प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारखान्याकडून हमीपत्र द्यावे.