सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेतील १७० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार चौकशीस सुरुवात झाली आहे. आज (शनिवारी) सुनावणीवेळी अनेक माजी संचालक व कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांच्या मागणीसाठी अर्ज दाखल केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना २७ मार्चला आणि माजी संचालकांना ३० मार्च रोजी म्हणणे मांडण्याचे आदेश चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी दिले. वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात अनेक १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्ण कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी यास स्थगिती दिली होती. विद्यमान सहकारमंत्र्यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन यावरील स्थगिती उठविली. त्यानुसार आता चौकशीस सुरुवात झाली आहे. १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बहुतांश माजी संचालक व कर्मचाऱ्यांनी लेखापरीक्षण अहवाल व संबंधित कागदपत्रांच्या मागणीचे अर्ज आज शनिवारी मोठ्या प्रमाणावर दाखल केले. संचालकांना ३० मार्च रोजी, तर कर्मचाऱ्यांना २७ मार्चला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीच्या आणखी दोन तारखा मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर आक्षेपार्ह रकमेबाबतच्या जबाबदारी निश्चितीचे काम सुरू होईल. अनेक दिग्गज राजकारण्यांचा या गैरव्यवहारात समावेश असल्याने या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १७० कोटींचा घोटाळाबॅँकेचा प्रवासवसंतदादा बँकेत ३१५ कोटींच्या ठेवी असून, ३२० कोटी रुपयांची कर्जे आहेत. यातील २९० कोटींच्या कर्जांची थकबाकी असल्याची माहिती २००९ मध्ये देण्यात आली होती. बँकेच्या राज्यात ३६ शाखा आहेत. २६ जून २००८ रोजी रिझर्व्ह बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यानंतर ७ जानेवारी २००९ रोजी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीबरोबरच शहरातील नागरी सहकारी पतसंस्थांच्या ठेवी अडकल्या आहेत.यांचा आहे समावेशमाजी मंत्री मदन पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, महापालिकेचे नगरसेवक सुरेश आवटी, माजी नगरसेविका बेबीताई पाटील, माजी नगरसेवक किरण जगदाळे, कुंदन बापूसाहेब पाटील, मुजीर जांभळीकर आदी ३४ माजी संचालकांचा यात समावेश आहे.
वसंतदादा बॅँकेची चौकशी अखेर सुरू
By admin | Updated: March 8, 2015 00:21 IST