शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

वसंतदादा बँक घोटाळ्याची चौकशी पूर्ण

By admin | Updated: July 7, 2016 00:21 IST

आठवड्यात दोषारोपपत्र : १७0 कोटी रुपयांचा घोटाळा; तत्कालीन संचालक, कर्मचाऱ्यांचे लक्ष नोटिसांकडे

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या १७0 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार चौकशी पूर्ण केली असून, येत्या आठवड्याभरात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या अनेक नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी यास स्थगिती दिली होती. विद्यमान सहकारमंत्र्यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन यावरील स्थगिती उठविली. त्यानुसार चौकशीस सुरुवात झाली होती. १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर महिन्यापूर्वी यातील दोन अधिकाऱ्यांना चौकशीतून वगळले आहे. तत्कालीन अध्यक्ष मदन पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांना याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे माजी संचालक, कर्मचारी आणि मृत कर्मचारी, संचालकांचे वारस अशांची संख्या आता शंभरावर गेली आहे. यापैकी कितीजणांवर दोषारोपपत्र दाखल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वसंतदादा बँकेच्या घोटाळ्यात अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचा समावेश असल्याने या चौकशीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पुन्हा त्यावर सुनावणी होऊन जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. दोषारोपपत्र दाखल होणार असल्याने तत्कालीन संचालक, अधिकारी, कर्मचारी यांची चिंता वाढली आहे. वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सहकारमंत्र्यांकडे दोन अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या अपिलामुळे काहीकाळ ही चौकशी प्रक्रिया रेंगाळली होती. मात्र स्थगिती दोन अधिकाऱ्यांपुरतीच असल्याचे कळल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी यास पुन्हा गती दिली. घोटाळ््यात अडकलेल्या बहुतांश माजी संचालक व कर्मचाऱ्यांचे म्हणणे सादर झाले आहे. चौकशी प्रक्रिया गत आठवड्यात पूर्ण झाली आहे. येत्या आठ दिवसात यासंदर्भातील दोषारोपपत्र दाखल होणार आहे. त्यासंदर्भातील तयारी आता चौकशी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. (प्रतिनिधी) नियमबाह्य कर्ज : अडचणीस कारणीभूत वसंतदादा शेतकरी सहकारी बँक अवसायनात काढण्यात आली आहे. बॅँकेचे एकूण २ हजार ७०० कर्जदार आहेत. कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे बँक अडचणीत आली. नियमबाह्य कर्ज वाटपामुळेच बँक अवसायनात गेल्याने बँकेचे तत्कालीन संचालक, अधिकारी व कर्मचारी अडचणीत आले आहेत. सध्या वसुलीचे काम गतीने सुरू असले तरी, बँक पूर्णपणे अडचणीतून बाहेर पडलेली नाही. मालमत्तांची जप्ती, लिलाव काढून वसुली करण्यात येत आहे. अडकलेले तत्कालीन संचालक... ४शशिकांत कलगोंड पाटील, नरसगोंडा सातगोंडा पाटील, सुरेश आदगोंडा पाटील, अमरनाथ सदाशिव पाटील, किरण राजाभाऊ जगदाळे, माधवराव ज्ञानदेव पाटील, तुकाराम रामचंद्र पाटील, सुरेश देवाप्पा आवटी, कुंदन बापूसाहेब पाटील, प्रमिलादेवी प्रकाशराव माने, सुभाष गणपती कांबळे, दादासाहेब वाघू कांबळे, निवृत्तीराव मारुती पाटील, सतीश आप्पासाहेब बिरनाळे, जंबुराव दादा थोटे, भरत महादेव पाटील, विजय विरुपाक्ष घेवारे, शिवाजीराव रामचंद्र पाटील, भगवान सीताराम पाटील, शिवगोंडा बंडू लांडे, बाजीराव रामराव पाटील, मुजीर आब्बास जांभळीकर, बेबीताई मारुती पाटील, वंदना संभाजी पाटील, निवास दत्ताजीराव देशमुख, दत्तात्रय श्रीपती सूर्यवंशी, सुधाकर धोंडिराम आरते, गजानन लक्ष्मणराव गवळी, सर्जेराव सखाराम पाटील, सुरेश जिनगोंडा पाटील, अरविंद शामराव पाटील, श्रीपाल नेमगोंडा बिरनाळे, आनंदराव मारुती पाटील यांच्यासह दिवंगत अध्यक्ष मदन पाटील यांच्या वारसांचाही याप्रकरणी समावेश करण्यात आला आहे.