शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा तालुक्यात मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांचीच गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत वाळवा तालुक्यातील मतदारांनी पॅनेल न पाहता आपापल्या गावातील उमेदवाराला पसंती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत वाळवा तालुक्यातील मतदारांनी पॅनेल न पाहता आपापल्या गावातील उमेदवाराला पसंती दिल्याचे चित्र मंगळवारी होते. मतदान केंद्रांवर तिन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून जणू कोरोनालाच आमंत्रण दिल्याचे दिसून आले.

इस्लामपूर शहरात सत्ताधारी सहकार पॅनेलचे संजय पाटील, रयत पॅनेलचे आनंदराव मलगुंडे, संस्थापक पॅनेलचे शिवाजीराव पवार उमेदवार आहेत. या तिघांच्याही समर्थकांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. सभासदांनी पॅनेल टू पॅनेल मतदान न करता आपल्या पसंतीच्या गावातीलच उमेदवाराला मत दिल्याची चर्चा आहे. नेर्ले-तांबवे गटातील नेर्लेत सहकारकडून संभाजी पाटील, इंदुमती जाखले, संस्थापकमधून सुभाष पाटील, रयतकडून प्रशांत पाटील उमेदवार आहेत. तांबवेत सहकारचे लिंबाजी पाटील, संस्थापककडून विक्रमसिंह पाटील, तर रयतकडून गणेश पाटील उमेदवार असल्याचे येथील ही मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली.

रेठरे हरणाक्ष येथे सहकारचे जे. डी. मोरे, संस्थापकचे महेश पवार, रयतचे विश्वासराव मोरे, अ‍ॅड. विवेकानंद मोरे असे एकूण चार उमेदवार असल्याने तेथे मोठी चुरस आहे. या गावातील सभासदांनी आपल्या गावातील उमेदवाराला पसंती देऊन उर्वरित मतदान पॅनेल टू पॅनेल केल्याची चर्चा आहे. बोरगावमधील मतदान केंद्रावर चुरशीने मतदान झाले. सहकारचे जितेंद्र पाटील आणि संस्थापकचे उदयसिंह शिंदे उमेदवार असून येथील केंद्रावर दोन हजारांहून अधिक कार्यकर्त्यांची गर्दी होती. सध्या बोरगाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे, तरीसुद्धा मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली. कामेरी येथे प्रा. अनिल पाटील रयत पॅनेलकडून एकमेव उमेदवार आहेत. तेथील काही गट रयत पॅनेलच्या आणि सहकार पॅनेलच्या पाठीशी असल्याचे दिसून आले. बहे येथे सहकारचे जयश्री पाटील (बहे), अविनाश खरात (खरातवाडी) तर संस्थापककडून मीनाक्षी दमामे (बहे), नितीन खरात (खरातवाडी), रयतकडून सत्वशिला थोरात (बहे) उमेदवार असल्याने येथेही उत्स्फूर्त मतदान झाले आहे. येडेमच्छिंद्र-वांगी गटातील येडेमच्छिंद्र येथील सहकार पॅनेलचे शिवाजी पाटील, संस्थापककडून बाबासाहेब पाटील तर रयतकडून संजय पाटील, तर याच गटातील घाटमाथ्यावर सहकारमधून बाबासाहेब शिंदे, संस्थापककडून माणिकराव मोरे, रयतकडून बापूसाहेब मोरे हे तिन्ही उमेदवार देवराष्ट्रे येथील आहेत. येथेही मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती. ए

सत्तेत कोण येणार, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असून आणि पैजाही लावल्या जात आहेत.

चौकट

मतपत्रिका १० पानांची

या निवडणुकीत तिन्ही पॅनेलचे मिळून एकूण ६३ उमेदवार, तर तीन अपक्ष आहेत. उमेदवारांची एकूण संख्या ६६ आहेत. प्रत्येक मतदाराला २१ मते देण्याचा अधिकार असल्याने मतदानासाठी वेळ लागत होता. मतपत्रिका १० पानांची आहे. त्यामुळे वयस्कर मतदाराला मतदान करताना अडचणीचे होत होते.