शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वैशाली पाटील, चंदनशिवे यांना सदस्यत्व रद्दचा इशारा

By admin | Updated: October 8, 2015 00:37 IST

कवठेमहांकाळचे राजकारण : सांगलीत बैठक

सांगली : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये सामील झालेले कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती वैशाली पाटील व पं. स. सदस्य शिवाजीराव चंदनशिवे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा बुधवारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीत बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्या निवासस्थानी कवठेमहांकाळ पंचायत समितीचे पाच सदस्य व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सातही सदस्यांनी एकत्र असल्याचे स्पष्ट करून पक्षीय आदेशाला बांधील असल्याचे सांगितले. या बैठकीबाबत माहिती देताना विलासराव शिंदे म्हणाले की, पंचायत समितीचे ९ सदस्य राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाच्या विरोधात काम करता येणार नाही. या कृतीबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याच्या हालचाली पक्षीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. चिन्हावर निवडून येऊनही अन्य पक्षात प्रवेश करणाऱ्या या दोन्ही पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करता येते का, याबाबत कायदेशीर मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्याचबरोबर आता सभागृहात उपसभापतींच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य काम करणार आहेत. सभापती वैशाली पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. त्याबाबतही लवकरच घेऊ, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)तेही आमचेच...सांगलीतील बैठकीला उपसभापती जगन्नाथ कोळकर, उषाताई ओलेकर, सुरेखा कोळेकर, कल्पना पाटील, पतंगराव माने उपस्थित होते. घोरपडे गटाचे अन्य दोन सदस्य या बैठकीला उपस्थित नव्हते, मात्र तेसुद्धा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्याने तेही आपलेच सदस्य असल्याचे शिंदे यांनी सांगितले.