शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात परजिल्ह्यांतील नागरिकांचे होतेय लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:27 IST

इस्लामपूर : कोरोना प्रतिबंधक लस मिळण्याबाबत गोंधळ सुरू असतानाच येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील दीडशेहून अधिक ...

इस्लामपूर : कोरोना प्रतिबंधक लस मिळण्याबाबत गोंधळ सुरू असतानाच येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील दीडशेहून अधिक नागरिकांनी येऊन लसीकरण करून घेतले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना लसीची प्रतीक्षा करत बसावे लागत आहे. सध्या शासनाने लागू केलेल्या जिल्हाबंदीचा भंग करत हे बाहेरील जिल्ह्यांतील नागरिक खुलेआम येत असल्याने प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे.

कोरोनाची लस घेण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करणे बंधनकारक केल्याने हा सर्व घोळ उद्भवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्र शासनाच्या स्तरावरून याबाबत अ‍ॅपचे नियोजन होण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाकडून लसींचा पुरवठा करण्याबाबतचे धोरणही अपुरे पडत असल्याने जिल्ह्याला चार-चार दिवस लस मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.

येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑनलाईन नोंदणी करून लसीकरणाची वेळ मिळालेल्या नागरिकांना लस देण्यात येते. दर दिवशी दोनशेजणांना लस देण्याचे उद्दिष्ट असते. या लसीकरणासाठी बाहेरील जिल्ह्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर नोेंदणी करून घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या लसीकरणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनाने जिल्हानिहाय अथवा तालुकानिहाय नावनोंदणीचा पर्याय या अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून दिला पाहिजे, अशी मागणी होत आहे.

चौकट

गंभीर दखल घेण्याची गरज

येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी झालेल्या लसीकरणावेळी सातारा जिल्ह्यातील २८, कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ आणि मूळ राजस्थानचे रहिवासी मात्र सध्या जयसिंगपुरात वास्तव्यास असणाऱ्या ३३ जणांनी जिल्हाबंदीचा आदेश मोडत लसीकरण करून घेतल्याचे येथील नोंदणी दप्तरावरून स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने या बाबीची गंभीरपणे दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.