शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचाऱ्याकडून खोट्या ओळखपत्राचा वापर

By admin | Updated: July 3, 2016 00:26 IST

आयुक्तांकडे तक्रार : कारवाई होणार

सांगली : महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांचा प्रभारी कार्यभार मिळालेले स्वच्छता कर्मचारी श्रीकांत वळसे यांनी खोटे ओळखपत्र तयार केले असून, त्यांच्यावर आयुक्तांनी फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते संभाजी सावंत यांनी केली आहे. सावंत यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वळसे हे सफाई कामगार आहेत. तरीही त्यांनी स्वच्छता निरीक्षक असे पद असलेले ओळखपत्र बाळगले आहे. ओळखपत्रावर आयुक्त, उपायुक्त यांच्या स्वाक्षऱ्या असतात. मात्र संबंधित कर्मचाऱ्याच्या ओळखपत्रावर नेमकी स्वाक्षरी कोणाची आहे, याची चौकशी करावी. ज्यांनी स्वाक्षरी केली असेल, त्यांच्यावरही कारवाई व्हावी. कोणत्याही प्रभारी पदाचा कार्यभार हा काही कालावधिसाठी असतो. अशा प्रभारीपदाच्या कार्यकाळात मूळ पदाचेचे ओळखपत्र बाळगणे आवश्यक असताना, वळसे यांनी प्रभारी पदाच्या नावे ओळखपत्र तयार करून घेतले आहे. आयुक्तांनी याबाबत सखोल चौकशी करून कर्मचाऱ्यासह संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनाबरोबर संबंधित कर्मचाऱ्याच्या ओळखपत्राची सत्यप्रतही संभाजी सावंत यांनी सादर केली आहे. (प्रतिनिधी)