शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदर आंदोलन पेटले

By admin | Updated: December 18, 2015 00:45 IST

‘८० : २०’ साठी शेतकरी आक्रमक : जिल्ह्यात जाळपोळ; बसेसवर दगडफेक; ऊसतोड ठप्प

सांगली : उसाची एफआरपी ठरलेल्या ८०:२० या फॉर्म्युल्यानुसार देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ऊसतोड बंद आंदोलनास गुरुवारी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या टायर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या. सावळवाडी (ता. मिरज) येथे राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न झाला. तासगाव तालुक्यात चार बसेसवर दगडफेक करण्यात आली. सांगलीत कर्नाळजवळ दहा बैलगाड्यांच्या टायर फोडण्यात आल्या, तर आमणापुरात रास्ता रोको आंदोलन झाले. आज, शुक्रवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘चक्का जाम’ आंदोलनास सुरुवात होणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार ऊस दर देण्यास जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी नकार दिल्याने आंंदोलनाचा भडका उडाला आहे. एफआरपीचा ८०:२० तोडगा निघाला असतानाही कारखानदारांनी एक पैसाही जमा न केल्याने शेतकऱ्यांत असंतोष आहे. बुधवारपासूनच जिल्ह्यात आंदोलनास सुरुवात झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या बेमुदत ऊस तोड बंद आंदोलनास शेतकऱ्यांतूनही प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील पलूस, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यांत ‘स्वाभिमानी’सह इतर शेतकरी संघटनांनी आंदोलन तीव्र केल्याने, गुरुवारी ऊस वाहतूक ठप्प झाली होती. सुरू असलेली ऊस वाहतूकही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरल्याने सांगली-तासगाव, सांगली-कर्नाळ मार्गावर वाहने काही काळ थांबून होती. गुरुवारी सकाळी सांगली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाळ-माधवनगर मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या दहा बैलगाड्यांच्या टायर फोडल्या. दोन ट्रॉलींच्या टायरही फोडण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आमणापूर (ता. पलूस) येथे ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. मिरज पूर्वभागात ‘स्वाभिमानी’ने ऊस वाहतूक अडवून आंदोलन केले. काही शेतकऱ्यांनी या आंदोलनास विरोध केल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांशी वादावादी झाली. कवठेमहांकाळ तालुक्यात रांजणी येथेही शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस वाहतूक अडविण्यात आली.