शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भडकेवाडीत अनोळखी तरुणाचा खून

By admin | Updated: January 21, 2015 00:20 IST

शरीराचे दोन तुकडे : मृतदेह पोत्यात भरून विहिरीत टाकला

विटा : एका ३५ ते ४० वर्षांच्या अनोळखी पुरूषाचा खून करून त्याच्या शरीराचे दोन तुकडे करून ते पोत्यात भरून मृतदेह विहिरीत टाकल्याची खळबळजनक घटना आज, मंगळवारी सकाळी १० वाजता खानापूर ते पेड रस्त्यावरील भडकेवाडी हद्दीत उघडकीस आली. विहिरीतील पोत्यात सापडलेला मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा खून गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.खानापूर ते पेड रस्त्यालगत भडकेवाडी हद्दीत वसंत चांगदेव बुर्ले यांची समाईकात विहीर आहे. आज मंगळवारी सकाळी १० वाजता ते विहिरीकडे गेले असता, एक पोते पाण्यावर तरंगताना आढळून आले. त्यावेळी बुर्ले यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांना ही माहिती मिळताच ते पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी विहिरीतील पोते बाहेर काढल्यानंतर त्यात त्यांना पुरूषाच्या शरीराचा पोटापासूनचा खालचा भाग सापडला. त्यानंतर परिसरात आणखी शोध घेतला असता, विहिरीच्या काठावरच दुसरे पोते सापडले. त्यात अज्ञात व्यक्तीच्या शरीराचा उर्वरित दुसरा भाग असल्याचे निदर्शनास आले.हा मृतदेह ३५ ते ४० वर्षांच्या पुरूषाचा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने ओळख पटली नाही. शिवाय दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात पसरली होती. या घटनेने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. बुर्ले यांची विहीर खानापूर ते पेड रस्त्यालगत आहे. अज्ञात हल्लेखोराने खून करून मृतदेहाचे दोन तुकडे करून ते पोत्यात घालून विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विटा पोलिसांत अज्ञात हल्लेखोरांविरूध्द हवालदार एस. आर. चव्हाण यांनी फिर्याद दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अनिल पोवार करीत आहेत. (वार्ताहर)