शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ उपकेंद्राबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. हे उपकेंद्र भौगोलिकदृष्ट्या खानापूर ...

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. हे उपकेंद्र भौगोलिकदृष्ट्या खानापूर येथेच होण्यासाठी ताकदीने आपली भूमिका मांडू, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड. धैर्यशील पाटील यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगावऐवजी खानापूर येथे व्हावे, या मागणीसाठी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्ट्रवादीचे खानापूर तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी संघटना व सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य धैर्यशील पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे स्थापन करावे, त्यासाठी विद्यापीठ स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी खानापूर उपकेंद्रासाठी दिलेले पत्र वैभव पाटील यांनी धैर्यशील पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी शिष्टमंडळाने शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर येथे होणाऱ्या उपकेंद्रासाठी आजपर्यंत झालेले विविध ठराव व जागा पाहणीची माहिती दिली.

त्यावेळी धैर्यशील पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी खानापूर येथील जागा सोयीस्कर असेल, तर त्याबाबत विद्यापीठ प्रशासन खानापूरकरांच्या मागणीचा नक्कीच विचार करेल. याबाबत येत्या दोन दिवसांत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून आपली भूमिका मांडली जाईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी अक्षय भगत, दिगंबर गुरव, ऋषिकेश भगत, रोहित भगत, शंभूराजे भगत, रोहित जगताप, विशाल भगत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट :

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरऐवजी तासगाव तालुक्यात होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. मंत्री सामंत यांना या भागातील भौगोलिक स्थितीची माहिती नाही. त्यामुळे त्यांनी विद्यापीठ उपकेंद्र स्थापनेबाबत घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा व विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे मंजूर करावे, अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन न्यायालयात दाद मागू, असा इशारा यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिला.

फोटो : २९ विटा १

ओळ : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर करावे, यासाठी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील शिष्टमंडळाने विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड. धैर्यशील पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली व मागणीचे निवेदन दिले.