शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांचा भारत घडविण्यासाठी संघटित व्हा

By admin | Updated: April 24, 2017 23:44 IST

सदाभाऊ खोत : इस्लामपुरात फुले-आंबेडकर जयंती; नागनाथअण्णा यांना मरणोत्तर पुरस्कार

इस्लामपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे. समाजातील कष्टकरी, शेतकरी आणि वंचित व दुबळ्या घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांचे विचार आचरणात आणून भारतीय लोकशाही सुदृढ करायला हवी, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात वाळवा तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने फुले, आंबेडकर जयंती महोत्सव झाला. यावेळी क्रांतिवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना मरणोत्तर ‘रिपब्लिकन मित्र’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. खोत यांच्याहस्ते हुतात्मा कारखान्याचे माजी अध्यक्ष महादेव कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच खोत यांच्या मातोश्री रत्नाबाई खोत यांना माजी आमदार भगवानराव साळुंखे, अरुण कांबळे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याहस्ते ‘माता रमाई’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी रमाई पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी आम्ही इस्लामपूरकर कल्चरल गु्रपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला.सिनेस्टार निवास कळसे यांच्या नृत्य समूहाचा कलाविष्कार कार्यक्रम झाला. सतीश चिके या अपंग कलाकाराने रसिकांची मने जिंकली. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांच्याविषयी व त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि त्यांचे समाजाला असणारे मोठे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. आरपीआयचे राज्य सचिव अरुण कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महेश परांजपे यांनी आभार मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, सागर खोत, नगरसेविका कोमल बनसोडे, प्रतिभा शिंदे, अन्नपूर्णा फल्ले, सीमा पवार, मयुरी मेश्राम, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, अमर बनसोडे, रोहन धुमाळे, राजू वाघमारे, दयानंद सुर्वे, बाळासाहेब कांबळे, किशोर जाधव आदींसह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)