लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात ॲकॅडमीच्यावतीने यंदाही झाडांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
निसर्ग हाच आपला खरा रक्षक आहे, याची जाणीव ठेवून ॲकॅडमीच्यावतीने दरवर्षी झाडांना राखी बांधण्यात येते. शांतिनिकेतन परिसर हा अनेक जातींच्या वृक्षवेलींनी बहरलेला आहे, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती ॲकॅडमीच्या इन्चार्ज समिता पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाला उपसंचालक डी. एस. माने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी ॲकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख संजय बामणे यांनी केले.