शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतदेह दोन तास फलाटावर

By admin | Updated: July 21, 2014 23:43 IST

कऱ्हाडमधील प्रकार : रेल्वे अधिकारी-पोलिसांचा वाद

मिरज : रेल्वे अधिकारी व पोलिसांच्या वादातून कऱ्हाड (जि. सातारा) रेल्वेस्थानक अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर बेवारस मृतदेह ठेवण्यात आला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानक अधीक्षक खर्चाची रक्कम देत नसल्याने रेल्वे पोलिसांनी हा प्रकार केला. स्थानक अधीक्षकाने मृतदेह नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था केल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला. रेल्वेस्थानक परिसरातील व रेल्वेखाली सापडून मृत्यू होणाऱ्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वेकडून पोलिसांना एक हजार रुपये खर्च देण्यात येतो. कऱ्हाड येथील स्थानक अधीक्षक एम. ए. स्वामी हे मृतदेह नेण्यासाठी खर्च देत नसल्याची रेल्वे पोलिसांची तक्रार आहे. रविवारी दुपारी कऱ्हाड रेल्वेस्थानकात अंदाजे ४५ वर्षे वयाच्या अज्ञाताचा बेवारस मृतदेह प्लॅटफॉर्मवर पडला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यासाठी व दफन करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी स्थानक अधीक्षक स्वामी यांच्याकडे खर्चाची मागणी केली. स्वामी यांनी खर्च देण्यास नकार दिल्याने पोलीस नाईक विठ्ठल मदने, गोपी ठोंबरे, दीपक ठोंबरे यांनी बेवारस मृतदेह स्थानक अधीक्षक स्वामी यांच्या कक्षाबाहेर फलाटावरच ठेवला. तब्बल दोन तास मृतदेह फलाटावर पडून होता. मात्र तरीही स्वामी यांनी खर्च देण्यास ठाम नकार दिला. अखेर स्वामी यांनी मृतदेह नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था केल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला. रेल्वेस्थानक परिसरात मनोरुग्ण व भिकारी, वृध्द, आजारी यासह अपघातात रेल्वेखाली सापडलेल्या बेवारसांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. बेवारस किंवा वारस असलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वे पोलिसांना खर्च देण्याची तरतूद आहे. मात्र कऱ्हाड रेल्वेस्थानकात स्थानक अधीक्षकांनी गेले वर्षभर मृतदेह विल्हेवाटीचा खर्च दिलेला नाही. यामुळे पोलीस स्वखर्चाने मृतदेहाचे सोपस्कार पार पाडत आहेत. रेल्वे अधिकारी व पोलिसांच्या वादातून हा प्रकार घडला. स्थानक अधीक्षक स्वामी यांच्याबाबत रेल्वे व्यवस्थापकांकडे तक्रार करण्यात आल्याचे मिरज रेल्वेचे निरीक्षक रमेश भिंंगारदेवे यांनी सांगितले. (वार्ताहर)