शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजपचा निवडणुकीसाठी गैरसोयीचा अजेंडा-- हारुण शिकलगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:26 IST

सांगली : महापालिकेची निवडणूक डोळ््यासमोर ठेवून भाजपने तिन्ही शहरात गैरसोयींचा अजेंडा आखला आहे. महापालिका क्षेत्रात विकासकामे ठप्प कशी होतील,

ठळक मुद्दे: महापालिकेचा कारभार मुंबईतून; जाणीवपूर्वक अडविली जातात विकासकामेपावसाळ्यापूर्वी ही कामे व्हावीत, अशी भावना होती.आज २५ दिवस उलटूनही वर्कआॅर्डर नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेची निवडणूक डोळ््यासमोर ठेवून भाजपने तिन्ही शहरात गैरसोयींचा अजेंडा आखला आहे. महापालिका क्षेत्रात विकासकामे ठप्प कशी होतील, याची दक्षता भाजपचे लोक घेत आहेत, अशी टीका महापौर हारुण शिकलगार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, पालकमंत्र्यांनी सांगलीत आल्यानंतर महापालिका पदाधिकारी भेटण्यास येत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. ही त्यांची निव्वळ स्टंटबाजी आहे. वास्तविक शासनाच्या इशाºयानेच महापालिकेत विकासाचा खेळखंडोबा सुरू आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षात महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच अडवणुकीचा उद्योग सुरू आहे. आयुक्तांमार्फत विकासकामांच्या फायली अडविल्या जातात. महापालिकेने स्वनिधीतून मंजूर केलेली २४ कोटी रुपयांची विकासकामे गेल्या वर्षभरात अडली आहेत. शहराला खड्ड्यांमध्ये लोटून महापालिकेत काँग्रेसला बदनाम करण्याचे षङ्यंत्रच सुरू आहे.

स्वच्छता अभियान हा काही भाजपने लावलेला शोध नाही. संत गाडगेबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी आदींनी हा स्वच्छतेचा दिलेला कानमंत्र अनेक वर्षे अभियान म्हणून राबविला जात आहे. सरकार कोणाचेही असो, २ आॅक्टोबरला अभियान राबविले जातेच. असे असताना केवळ चमकोगिरीसाठी या अभियानाचा बोलबाला सुरू केला आहे. त्यांनी आम्हाला डालवून हा कार्यक्रम केला. हे राजकारण कोणाच्या इशाºयाने सुरू आहे. महापालिकेचा कारभार आता मुंबईतूनच सुरू झाला आहे. स्वच्छ असलेल्याच कर्मवीर भाऊराव पाटील चौक, विश्रामबाग रस्त्यावर पालकमंत्री व आयुक्तांनी सफाईचा स्टंट केला. चार दिवस शामरावनगरातील लोक दलदल, पाण्यात अडकले आहेत, ते दिसले नाही का? ते शामरावनगरात गेले असते, तेथे सफाई केली असती तर, खºयाअर्थाने जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतले असते, असा टोला त्यांनी लगावला.

अमृत योजनेची निविदा स्थायी समिती अस्तित्वात नसताना मान्य करण्यात आली. त्यामुळे टेंडरचे अधिकार महासभेचे होते. असे असूनही आयुक्तांच्या पुढाकाराने शासनाने परस्पर मुंबईत टेंडर कशासाठी काढले? शहरात ड्रेनेज, पाणी योजनेसह विविध कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डयांत शहर अडकले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामे व्हावीत, अशी भावना होती.ती कामेही प्रशासनाने केली नाहीत. गेल्या महासभेत २८ आॅगस्टरोजी सर्व नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांवर आगपाखड केली होती. त्यानंतर आठ दिवसांत वर्कआॅर्डर काढून कामे सुरू होतील, असे आयुक्तांनी सांगितले. पण आज २५ दिवस उलटूनही वर्कआॅर्डर नाहीत.अनेक प्रश्न प्रलंबितकुपवाडच्या ड्रेनेज योजनेसंदर्भात मलनिस्सारण केंद्रासाठी जागा निश्चितीसह सर्वच कामांसाठी महासभेने आयुक्तांना वर्षभरापूर्वी प्राधिकृत केले आहे. परंतु हे प्रश्नही प्रशासनाने अद्याप मार्गी लावलेले नाहीत. नगरसेवक, पक्षात भांडणे लावून अधिकाºयांकडून भाजपची पेरणी सुरू आहे. एकूणच आयुक्तांचा कारभार शासनाच्या इशाºयाने मुंबईतूनच चालत आहे, अशी टीका शिकलगार यांनी यावेळी केली.