शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता

By admin | Updated: April 23, 2016 01:00 IST

बी. जी. कोळसे-पाटील : आंबेडकर जयंतीनिमित्त कास्ट्राईब संघटनेकडून जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

सांगली : जगातील कष्टकरी जनतेच्या उध्दारासाठी कार्य करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार मांडला होता. देशाचा अन्नदाता असलेल्या जनतेचे शोषण करुन आपला उध्दार साधणाऱ्या प्रवृत्तीचे आता राज्य आल्याने, कष्टकरी जनतेच्या पिळवणुकीत वाढच होत असून आरएसएसच्या विषारी विचारसरणीमुळे देशात अस्वस्थता निर्माण झाल्याचे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी शुक्रवारी केले. जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात जिल्हा परिषद प्रशासन, बार्टी, पुणे आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘कामगार संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शोषणातून मुक्तता हा राज्यघटनेचा उद्देश फक्त आणि फक्त आंबेडकरांच्यामुळे सफल झाला आहे. जगातील कोणत्याच राज्यघटनेत याचा उल्लेख नसल्याने जगभरातील शोषितांच्या उध्दारासाठी त्यांनी कार्य केले. मात्र, सध्या आरएसएसमुक्त भारताची घोषणा करत असताना देशातील अस्वस्थ परिस्थिती प्रकर्षाने जाणवते. आरएसएसने आपल्या विषारी विचारसरणीचा खुबीने वापर केल्याने देशात विचारांची लढाई करण्याची वेळ आहे. आरएसएसच्या या विचारसरणीला प्रत्युत्तर देण्यासाठी आंबेडकरांचे विचार उपयोगी पडणार आहेत.त्यांनी पुढे सांगितले की, देशातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था अधिक प्रबळ करण्यासाठी नेहमीच गोळवलकर, टिळक आणि सावरकरांचे विषारी विचारच कारणीभूत ठरले आहेत. इतिहासाकडे चिकित्सक पध्दतीने पाहिल्यास, वास्तवावर आधारित इतिहासाचे पुनर्लेखन करणे आवश्यक बनले आहे. समाजात निर्माण झालेल्या दु:खाचे मूळ विषारी विचारसरणीत असल्याने या विचारसरणीला झिडकारले पाहिजे. आंबेडकरांचे विचार समाजात रुजविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करायला हवेत, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी रघुनाथ भोसले, डॉ. बाबूराव गुरव, गणेश मडावी, बाजीराव प्रज्ञावंत, विजय सातपुते, मनोज बनकर, संतोष कदम, नरेंद्र खांडेकर, विकास देवके, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंबेडकर समजूच दिले नाहीतदेशातीलच नव्हे, तर जगभरातील कष्टकरी मानवजातीच्या कल्याणासाठी आंबेडकरांचे कार्य प्रेरणादायी ठरते. मात्र, भांडवलदारांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या लोकांना आंबेडकरांचे हे महान कार्य कळतच नाही, त्यांना कळूही दिले जात नाही, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले.