शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका हद्दीत विनापरवाना ३५ बेकरी उत्पादक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 00:16 IST

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : सुनील आंबोळे यांच्या निलंबनाची नगरसेवक युवराज गायकवाड यांची मागणी

सांगली : महापालिका क्षेत्रात ३० ते ३५ बेकरी उत्पादक विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. या उत्पादकांकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगीच घेतली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. तरीही आरोग्य विभागाकडून बेकरी उत्पादकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. यामागे मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप नगरसेवक युवराज गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केला.याप्रकरणी आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांना निलंबित करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शहरात दोन महिन्यांपूर्वी नव्यानेच सुरू झालेल्या एका बेकरीबाबत गायकवाड यांनी प्रशासनाकडू माहिती मागविली होती. त्यात या बेकरीला परवानगी नसल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली. पण अजूनही आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. अशातच आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीद्वारे महापालिका हद्दीत ३० ते ३५ बेकरी उत्पादक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. या बेकरी उत्पादकांकडून ७० ते ८० विक्रेते माल खरेदी करून व्यवसाय करतात. त्यांनीही महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. याबाबत गायकवाड म्हणाले की, बेकरी उत्पादक व विक्रेत्यांनी परवाना न घेताच व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बेकरी व्यावसायिकांंनी घरपट्टी व पाणीपट्टीचा करही बुडविला आहे. त्यातून पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांना घरपट्टी व पाणीपट्टी व्यावसायिक दराने लागू करण्याची गरज आहे. त्यांनी पालिकेची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी दाखल करून कराची वसुली करावी, यासाठी आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेणार आहोत. केवळ आरोग्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या दालनासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)वकिलांच्या अभिप्रायाला केराची टोपलीएका बेकरीवरील कारवाईसंदर्भात आरोग्य विभागाने महापालिकेच्या कायदा सल्लागारांचा अभिप्राय मागविला होता. कायदा सल्लागारांनी विनापरवाना बेकरी व्यवसाय करणे चुकीचे असून, अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करून बेकरी बंद करण्याची सूचना केली होती. पण या अभिप्रायालाही आरोग्याधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला.