लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : केंद्र सरकारची उज्ज्वला गॅस ही फसलेली योजना आहे. वाढलेले गॅस दर व पेट्रोल, डिझेलच्या दराने महिलांचे आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले.
आटपाडी येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला मेळावा, उन्नती महिला गारमेंट व ट्रेंनिग सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील यांनी आयोजन केले होते. यावेळी सुश्मिताताई जाधव, बाळासाहेब पाटील, हणमंतराव देशमुख, रावसाहेब पाटील, बाळासाहेब मुळीक, सुशांत देवकर, एन. पी. खरजे, आनंदराव पाटील, अश्विनी कासार आदी उपस्थित होते.
रूपाली चाकणकर म्हणाल्या की, भाजपाचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडे मदत मागत आत्याचारातून वाचवण्याची विनंती केली; तिला राष्ट्रवादीकडून संपूर्ण मदत करणार आहोत. राष्ट्रवादीकडे मदतीची अपेक्षा करणे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे यश आहे.
अनिता पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हणमंतराव देशमुख, सुशांत देवकर, सुश्मिता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट
उद्योजकता पुरस्काराने गाैरव
उन्नती महिला फाउंडेशनच्या वतीने महिला उद्योजकता पुरस्कार आशा देशमुख, वैशाली सावंत, मंजूश्री पाटील, छाया कदम, अपर्णा भिंगे, सविता कुंभार, उज्ज्वला सरतापे, अर्चना वाघमारे यांना देण्यात आला.