शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Lok Sabha Election 2019 नतद्रष्ट शेतकरी नेत्याला घरी बसवा:उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:16 IST

इस्लामपूर : शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाºया नतद्रष्ट शेतकरी नेत्याला या निवडणुकीत घरी बसवा, असा घणाघात शिवसेनेचे ...

इस्लामपूर : शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाºया नतद्रष्ट शेतकरी नेत्याला या निवडणुकीत घरी बसवा, असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांच्यावर केला. शिवसेना जे करते ते रोखठोक करते. गेल्या ४ ते ५ वर्षांत आमचे संबंध गोड, मधूर, कडू असले तरी, चांगल्या कामात कधी पाय आडवा घातला नाही. शेतकरी आणि जनतेसाठी शिवसेना-भाजपची युती ताकद पणाला लावणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.येथील नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृह मैदानावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी झालेल्या ‘विजय संकल्प सभेत’ ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, उमेदवार धैर्यशील माने, माजी खा. निवेदिता माने, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश हाळवणकर, आ. उल्हास पाटील, आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. सत्यजित पाटील, आ. राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.ठाकरे म्हणाले, ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकरी केंद्रबिंदू आहे. शेतकºयांना पेन्शन देणारे हे पहिलेसरकार असेल. काश्मीर देशाचा अविभाज्य घटक असल्याने ३७० कलम काढणारच. देशद्रोह करणाºयाला फासावर लटकवणारच. सावरकरांसारख्या जाज्वल्य देशाभिमान बाळगणाºया देशभक्ताला डरपोक म्हणणारे राहुल गांधी लोकसभेतही पोहोचले नाही पाहिजेत. त्यांनी पंतप्रधान पदाचे स्वप्न बघण्याअगोदर देशाचाइतिहास आणि वीरांचा त्याग समजून घ्यायला हवा.चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप आता सेनेच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. शेट्टींना पाडायला भाजप, सेना लागणार नाही. वसंतदादा, विखे-पाटील आणि मोहितेंना फसवणाºया पवारांसारख्या हुशार नेत्याच्या पिंजºयात शेट्टी फसले आहेत. धैर्यशील माने म्हणाले, माझी लढाई व्यक्तीविरुध्द नसून, प्रवृत्तीविरोधी आहे. प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावणाºया शेतकरी नेत्याचा त्याचवेळी निकाल लागला आहे.शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे संजय कोले, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी स्वागत केले.सभेचे संयोजक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, नीता केळकर, माजी आ. भगवानराव साळुंखे, विक्रम पाटील, राहुल महाडिक, गौरव नायकवडी, भीमराव माने, कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे प्रमुख मुरलीधर जाधव, सुरेश साळोखे, वैभव शिंदे, नितीन बानुगडे-पाटील, अरुण दुधवडकर, जयराज पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक