शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: April 12, 2017 00:18 IST

सोना अलाईज खंडणी प्रकरण; हत्येच्या प्रयत्नाचा अन् खंडणीचा आरोप

सातारा : ‘खंडणी व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. दरम्यान, या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहे,’ अशी माहिती अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी दिली.लोणंद येथे सोना अलाईज या नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक राजीव जैन यांना १८ फेब्रुवारीला खासदार उदयनराजे भोसले यांनी येथील सर्किट हाऊसवर बैठकीसाठी बोलाविले होते. ‘कंपनीतील कामगारांचे काय झाले?,’ असे विचारून उदयनराजे यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर उदयनराजे यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप जैन यांनी केला होता. शहर पोलिस ठाण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १५ जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी नऊजणांना अटक केली आहे, तर तीनजण अद्याप फरार आहेत.दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी या घटनेनंतर न्यायालयात तत्काळ अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. मंगळवारी सरकारी पक्षाच्या वतीने नितीन मुके आणि महेश कुलकर्णी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत असल्याचा आदेश दिला. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य !खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे. सकृतदर्शनी फिर्यादीला मारहाण केल्याचा पोलिसांकडे पुरावा आहे. मात्र, तपास अर्धवट असून, अद्याप पूर्ण व्हायचा आहे. तसेच खंडणी स्वरूपात २४ लाख घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या कथित रकमेची रिकव्हरीही व्हायची आहे. तसेच जादा तपास आणि अद्याप काही आरोपींना अटक करायची आहे. सर्किट हाऊसवर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही फिर्यादी आणि संशयित येताना आणि जाताना दिसत आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाने आपल्या युक्तिवादामध्ये केली.