शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती घराण्याच्या जमीन विक्रीस उदयनराजेंना तूर्त मनाई

By admin | Updated: May 31, 2017 23:12 IST

छत्रपती घराण्याच्या जमीन विक्रीस उदयनराजेंना तूर्त मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनामवर्ग १ सत्ताप्रकारच्या सर्व जमिनी आणि देवस्थान इनाम हक्काच्या सर्व जमिनी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येणार नाहीत. तसेच विजयसिंहराजे भोसले यांनी दाखल केलेल्या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत घराण्याच्या सर्वप्रकारच्या जमिनी विक्री करु नयेत. तसेच त्यावर इतर कोणाचा हक्क निर्माण करु नये, अशी तूर्त मनाई दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती के. एफ. एम. खान यांनी नुकतीच केली आहे, अशी माहिती विजयसिंंहराजे भोसले यांच्या कार्यालयातून देण्यात आली. याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे की, विजयसिंंहराजे भोसले यांनी सातारा दिवाणी न्यायालयात उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांच्या विरोधात २००३ मध्ये दावा दाखल केला होता. सदर दाव्यात महाबळेश्वर, लिंंब, बावधन, बोंडारवाडी, कोडोली, गोडोली, आरफळ यासह छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनाम वर्ग १ सत्ताप्रकारच्या सर्व जमिनी आणि प्रतापगड, शिंगणापूर यासह सर्व देवस्थान इनाम हक्काच्या सर्व जमिनी छत्रपती घराण्याच्या सामाईक मालकीच्या आहेत, असे जाहीर होऊन मिळावे. सदर जमिनी अहस्तांतरणीय, अविभाजीय आहेत, असे जाहीर होवून मिळावे. सदर मिळकती सातारा छत्रपती घराण्याच्या सरंजाम इनाम सत्ताप्रकार व देवस्थान इनाम सत्ताप्रकाराच्या सर्व जमिनी उदयनराजे, कल्पनाराजे यांनी महाराष्ट्र शासन व वादी विजयसिंंहराजे व त्यांचे बंधू अभयसिंंहराजे भोसले,शिवाजीराजे भोसले यांच्या संमतीशिवाय कोणासही विक्री अथवा अन्यप्रकारे तबदील करु नयेत. स्वत: अथवा कुळ, एजंट अगर मुखत्यार मार्फत करु नयेत, अशी निरंतर ताकीद मागणी करण्यासाठी दावा दाखल केला होता. तसेच, या दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत उदयनराजे व कल्पनाराजे यांनी स्वत: अगर इतरांमार्फत सातारा छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनाम वर्ग १ व देवस्थान इनाम सत्ताप्रकारच्या कोणत्याही मिळकती अन्य कोणालाही गहाण, दान, लीज, लीन, बक्षिस, खरेदी- विक्री अगर अन्यप्रकारे हस्तांतर करु नयेत व त्याच्या नोंदी महसूल रेकॉर्डला करु नयेत, अशी तुतातूर्त ताकीद देण्यासाठी वादी यांनी अर्जही केला होता. सदर अर्जाची सुनावणी होऊन न्यायाधीश श्रीमती खान यांनी हा निर्णय दिला आहे.वादी विजयसिंंहराजे भोसले यांची दाव्याच्या दरम्यानची तुर्तातूर्त ताकीदीची मागणी मंजूर करुन सातारा छत्रपती घराण्याच्या राजकीय सरंजाम इनाम व देवस्थान इनाम सत्ताप्रकारच्या सर्व जमिनीमध्ये विजयसिंहराजे भोसले व त्यांचे बंधू दिवंगत अभयसिंंहराजे भोसले व शिवाजीराजे भोसले यांना हक्क आहे. सर्व मिळकती शासनाने फॅमिली ग्रँड म्हणून दिल्या आहेत. सदरच्या मिळकती शासनाच्या पुर्व परवानगीशिवाय विक्री करता येत नाहीत, असे स्पष्टपणे धरुन प्रतिवादी उदयनराजे व कल्पनाराजे यांना सदर जमिनी शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येणार नाहीत. म्हणून दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत सदर जमिनींची विक्री अथवा जमिनीवर इतर कोणाचाही हक्क निर्माण करु नये, अशी तुर्तातूर्त ताकीद संबंधित न्यायालयाने दिली आहे. जुने व्यवहारही रद्द करण्याची मागणीमहाबळेश्वर व इतर परिसरात खासदार उदयनराजे यांच्यासोबत जमिनीसंदर्भात पूर्वी अनेकांचे व्यवहार झाले आहेत. वादी यांनी यापूर्वी जमीन विक्रीचे झालेले व्यवहारही रद्द करुन मागितले आहेत, असेही विजयसिंंहराजे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.