शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी मॉडिफाय करणाऱ्यांची पोलिसांकडून कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वाढदिवसानिमित्त सांगलीवाडी येथे बेकायदा मॉडिफाय दुचाकींची आवाजाची स्पर्धा भरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : वाढदिवसानिमित्त सांगलीवाडी येथे बेकायदा मॉडिफाय दुचाकींची आवाजाची स्पर्धा भरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. या स्पर्धेविषयी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरून संदेश पाठविणाऱ्या व शुक्रवारच्या कारवाईवेळी पळून गेलेल्या दुचाकीस्वारांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अजय सिंदकर यांनी तरुणांसह पालकांनाही यावेळी प्रबोधन केले.

विनापरवाना दुचाकीच्या आवाजांची स्पर्धा भरवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ वाहनांवर शुक्रवारी शहर पोलिसांनी कारवाई केली हाेती. यावेळी पळून गेलेल्या १९ जणांना शनिवारी बोलावून घेत त्यांना समज देण्यात आली. शिवाय या स्पर्धेविषयी व्हॉटसॲप संदेश पाठविणाऱ्यांनाही बोलावून घेण्यात आले होते. अशा ग्रुपवर सायबर पोलिसांकडून कडक पाहणी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी उपअधीक्षक टिके यांनी सांगितले. या बैठकीला ३२ व्हॉटस्ॲप ग्रुपच्या ॲडमिनसह तरुणांचे पालकही उपस्थित हाेते.

----------------------------

फोटो २६ सिटी ०१ नावाने एडिटोरियल