शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डफळापूरजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST

जत : डफळापूर (ता. जत) येथील देवाप्पा मल्लाप्पा तेली (वय ५०) यांना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक बसून ...

जत : डफळापूर (ता. जत) येथील देवाप्पा मल्लाप्पा तेली (वय ५०) यांना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक बसून त्यांचा अपघाती मुत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास डफळापूर ते जत रस्त्यावर हॉटेल प्रीतमसमोर घडली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर घटनेमुळे धोकादायक ऊस वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ट्रॅक्टर डफळापूरहुन जतला निघाला हाेता. यावेळी दुचाकीवरून शेताकडे निघालेल्या देवाप्पा तेली यांना पुढील वाहनाच्या हेडलाईटमुळे समोरून येणारा ट्रॅक्टर दिसला नाही. त्यामुळे त्यांची मोटारसायकल थेट ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना सांगली येथे घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची जत पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

चौकट

जत शहर व परिसरातील प्रत्येक रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातील बहुसंख्य वाहनांना रिफ्लेक्टर नाही. त्यामुळे ही वाहतूक जीवघेणी ठरू लागली आहे. पोलीस व प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

फोटो : ०२ देवाप्पा तेली