शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

दोन चिमुकल्या भावांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: April 25, 2017 23:14 IST

दोन चिमुकल्या भावांचा बुडून मृत्यू

उंब्रज : येथील कृष्णा व तारळी नदीच्या संगमावर पोहण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने उंब्रजकर सुन्न झाले असून, ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान येथील जयविजय चौकात राहणाऱ्या कुऱ्हाडे कुटुंबातील रुद्र राजेंद्र्र कुऱ्हाडे (वय ७), बाबू राजेंद्र कुऱ्हाडे (५) हे सख्ख्ये भाऊ पोहण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या कृष्णा-तारळी नदीच्या संगमावर गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शेजारील एक लहान मुलगा होता. रुद्र व बाबू हे दोघे पाण्यात खोलवर गेल्यानंतर पाण्यात बुडू लागले. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत असलेला लहान मुलगा घडलेली घटना सांगण्यासाठी जयविजय चौकात ओरडत आला. त्यानंतर तेथील युवक व नागरिकांनी संगमाकडे धाव घेतली. त्यांनी तातडीने पात्रात उतरून मुलाचा शोध घेऊन मुलांना बाहेर काढले. या दोघांपैकी एकजण जागीच मृत झाला होता, तर दुसरा बऱ्यापैकी शुद्धीवर होता. त्याला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला. कुऱ्हाडे कुटुंब हे अतिशय गरीब कुटुंब आहे. या मुलांचे वडील राजेंद्र हे ट्रक चालक आहेत, तर मुलाची आई मोलमजुरी करते. ही अनपेक्षित घटना घडल्यानंतर घरासमोर दोन लहान चिमुकल्यांचे मृतदेह दिसल्यानंतर कुऱ्हाडे कुटुंबाने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या दोन चिमुकल्यांवर रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)