शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

बेळगावजवळ अपघातात सांगलीचे दोघेजण ठार

By admin | Updated: April 24, 2016 23:53 IST

ट्रकची धडक : मृतात पोलिसाचा समावेश

सांगली : ट्रकने जोराची धडक दिल्याने मोटारीतील दोघेजण जागीच ठार झाले. अरुण भीमराव कदम (वय ४४, रा. गव्हर्न्मेंट कॉलनी) व सुहास पांडुरंग शेटके (५४, गावभाग, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. बेळगाव-खानापूर रोडवर देसूरजवळ अल्मा मोटर्सनजीक शनिवारी रात्री हा भीषण अपघात झाला. यामध्ये कदम यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. अरुण कदम हे पोलिस हवालदार होते. सांगली पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात ते नेमणुकीस होते.सोनसळ (ता. कडेगाव) हे अरुण कदम यांचे गाव आहे. सांगली पोलिस दलात त्यांची २० वर्षे सेवा झाली आहे. नियंत्रण कक्षात नेमणूक झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून ते सांगलीतील गव्हर्न्मेंट कॉलनीतील वडिलांच्या फ्लॅटमध्ये राहत होते. बेळगाव जिल्ह्यात देसूर ही त्यांची सासूरवाडी आहे.तिथे यात्रा असल्याने ते पत्नी व मुलासोबत मोटारीने दोन दिवसांपूर्वी देसूरला गेले होते. मोटारीवर सुहास शेटके चालक होते. यात्रा झाल्यानंतर ते शनिवारी रात्री सांगलीला परतण्यासाठी निघाले होते. ते बेळगावजवळ आल्यानंतर, भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारीला जोराची धडक दिली. यामध्ये मोटार रस्त्याकडेला उलटली. या अपघातात कदम व शेटके यांचा जागीच मृत्यू झाला, तर कदम यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच त्यांचे नातेवाईक तातडीने बेळगावला रवाना झाले होते. (प्रतिनिधी)मुले बचावलीकदम यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगी परीक्षा असल्याने त्यांच्यासोबत गेली नव्हती. फक्त मुलगा गेला होता. परीक्षा झाल्याने त्याला सुटी लागली आहे. त्यामुळे त्याने मामाकडे राहणार असल्याचा आग्रह धरून त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला तिथेच सोडून कदम दाम्पत्य सांगलीला येण्यास निघाले होते. मुले त्यांच्यासोबत नसल्याने ती या अपघातातून बचावली.