शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्याजवळ अपघातात दोघे ठार

By admin | Updated: January 5, 2016 01:00 IST

दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक

शिराळा : पाडळीवाडी (ता. शिराळा) फाट्याजवळ दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन दोघे ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. अमोल अनिल नरुले (वय ३०, रा. पाटील पेट्रोलपंपामागे, इस्लामपूर, ता. वाळवा) व बबन परशुराम वाघमारे (४५, रा. हत्तेगाव, ता. शिराळा) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी दुपारी बाराच्यादरम्यान हा अपघात झाला.अमोल नरुले शिराळ्याहून अंत्री खुर्दकडे मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच १० बीव्ही ४२४८) जात होते, तर बबन वाघमारे व त्यांचे वडील परशुराम रामचंद्र वाघमारे (७०) हेही मोटारसायकलवरून (क्र. एमएच १० एए ६१०३) अंत्री खुर्दकडून शिराळ््याकडे येत असता, पडळीवाडी फाट्यावर दोन्ही दुचाकींची धडक झाली. यामध्ये अमोल नरुले रक्तस्त्राव होऊन जागीच ठार झाले, तर बबन वाघमारे व परशुराम वाघमारे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र बबन वाघमारे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.परशुराम वाघमारे यांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार एस. एस. सुपनेकर तपास करीत आहेत. (वार्ताहर)डबा आणताना काळाचा घालाअमोल नरुले यांचे इस्लामपूर येथील गांधी चौकात भांड्याचे दुकान आहे, तर त्यांच्या आई शिराळा येथील श्री शिवछत्रपती विद्यालयात शिक्षिका आहेत. त्यांचे आजोळ अंत्री खुर्द आहे. सकाळी आई विजया नरुले यांना शाळेत सोडून जेवणाचा डबा आणण्यासाठी ते अंत्रीकडे निघाले असता, हा अपघात झाला.रक्षाविसर्जनाहून परतताना अपघातबबन वाघमारे मुंबई येथे कामाला आहेत. त्यांची भावजय सोनाबाई यांचे निधन झाले असून, त्यांच्या रक्षाविसर्जनासाठी ते गावी आले होते. रक्षाविसर्जन आटोपून रेड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी ते वडिलांना बरोबर घेऊन निघाले होते. यावेळी काळाने त्यांच्यावर झडप घातली. बबन यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार वर्षाचा मुलगा, नऊ वर्षाची मुलगी असा परिवार आहे.