शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोन जोडप्यांची ‘डीएनए’ चाचणी

By admin | Updated: May 22, 2017 23:45 IST

आणखी दोन जोडप्यांची ‘डीएनए’ चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्या प्रकरणातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या आणखी दोन जोडप्यांचे नमुने ‘डीएनए’ तपासणीसाठी पोलिसांनी सोमवारी घेतले. मुलीचा गर्भ असल्याने त्यांनी गर्भपात केला असून, यामध्ये इचलकरंजी (जि. कोल्हापूर) व ऐनवडगाव (जि. बेळगाव) या गावच्या जोडप्यांचा समावेश आहे. पोलिसांनी आतापर्यंत डीएनएसाठी २३ जोडप्यांना शोधून काढले आहे.मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर खिद्रापुरेचे भ्रूणहत्येचे रॅकेट उघडकीस आले होते. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळ येथे ओढ्यालगतच पुरले होते. जेसीबीने खुदाई केल्यानंतर तब्बल १९ भ्रूण सापडले होते. या भ्रूणांचे अवशेष ‘डीएनए’साठी यापूर्वीच पाठविले आहेत. पण ज्या महिलांचे गर्भपात केले होते; त्यांचेच हे भ्रूण आहेत का, याचा तपास करणे महत्त्वाचे होते. यासाठी पोलिसांनी येथे गर्भपात केलेल्या महिलांचा शोध सुरू ठेवला. दोन महिन्यापासून गर्भपात केलेल्या महिलांचा शोध सुरू आहे. या महिला प्रामुख्याने सांगली व कोल्हापूर जिल्"ातील तसेच कर्नाटकातील असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे.पोटात वाढत असलेला गर्भ मुलीचा असल्याचे गर्भलिंग निदान तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर, अनेक महिला पतीच्या मदतीने खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपात करण्यास येत असत. खिद्रापुरेविरुद्ध भक्कम पुरावा गोळा करण्याचे, तसेच गर्भपात केलेल्या महिलांचा व त्यांच्या पतींचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू ठेवले होते. यामध्ये त्यांना यशही येत आहे. आतापर्यंत २३ जोडप्यांना ‘डीएनए’ तपासणीसाठी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आहे. त्यांनीही गर्भपात केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. सापडलेल्या भ्रूणांच्या अवशेषासाठी या जोडप्यांची डीएनए तपासणी केली जात आहे. सोमवारी इचलकरंजी व ऐनवाडी येथील दोन जोडप्यांना ताब्यात घेऊन त्यांचे डीएनएसाठी नमुने घेतले. त्यांनी खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपात केल्याची कबुली दिली आहे. बारा अहवाल मिळालेआतापर्यंत बारा भ्रूणांच्या ‘डीएनए’ तपासणीचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. यामध्ये पाच भ्रूण मुलींचे, तर तीन मुलांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रयोगशाळेत अजूनही काही अहवाल प्रलंबित आहेत. खिद्रापुरेसह संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.