शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या आणखी दोन मुकादमांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST

नेवरी (ता. कडेगाव) येथील बबन मारुती महाडिक यांना ऊस तोडणी मजूर पुरवतो असे सांगून त्यांच्याकडून विकास ...

नेवरी (ता. कडेगाव) येथील बबन मारुती महाडिक यांना ऊस तोडणी मजूर पुरवतो असे सांगून त्यांच्याकडून विकास अमरसिंह चव्हाण (वय ४८, रा. सांगवी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याने २० मार्च २०२० ते १९ सप्टेंबर २०२० या कालावधीत तीन लाख रुपये रोख घेतले व दोन लाख रुपये एनईएफटीने घेतले. परंतु त्यानंतर बबन महाडिक यांना ऊसतोड मजूर पुरवले नाहीत. अशा रीतीने मुकादम विकास चव्हाण याने पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल फिर्यादी बबन महाडिक यांनी शनिवारी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

तडसर (ता. कडेगाव) येथील सिद्धार्थ सर्जेराव पवार हे काम करीत असलेल्या कडेपूर (ता. कडेगाव) येथील यात्रा जागरी वर्क्स एलएलपी या कंपनीस ऊसतोडणीकरिता ऊसतोड मजूर व वाहने पुरवतो असे सांगून सिद्धार्थ पवार यांच्याकडून बंडू दादाराव पालकर (३८, रा. चारदरी, ता. धारूर, जि. बीड) याने २३ फेब्रुवारी २०१८ रोजी कंपनीचे तीन लाख रुपये घेतले. परंतु त्यानंतर मजूर व वाहने पुरवली नाहीत. त्यामुळे फिर्यादी सिद्धार्थ पवार यांनी शनिवारी मुकादम बंडू पालकर याने तीन लाख रुपयांची फसवणुक केल्याबद्दल कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे करीत आहेत.