शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोन एजंट ताब्यात

By admin | Updated: March 15, 2017 00:28 IST

‘म्हैसाळ’प्रकरण; एजंटांची संख्या सहावर; मृत विवाहितेच्या पतीस पोलिस कोठडी

मिरज : म्हैसाळ येथील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्याकडे लिंगनिदान व गर्भपातासाठी रुग्ण आणणाऱ्या आणखी दोन एजंटांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी चार एजंटांना अटक करण्यात आली आहे. मृत विवाहितेचा पती प्रवीण जमदाडे याची न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी वाढविली आहे. मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा अनैसर्गिक गर्भपात व तिच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती प्रवीण जमदाडे अटकेत आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत दि. १७ मार्चपर्यंत तीन दिवसांची वाढ केली. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्याकडे लिंगनिदान व गर्भपातासाठी रूग्ण आणणाऱ्या सातगोंड पाटील, यासिन तहसीलदार,संदीप विलास जाधव, वीरेनगोंडा रावसाहेब गुंमटे या चार एजंटांना यापूर्वी अटक केली आहे. पोलिसांनी आणखी दोन एजंटांना ताब्यात घेतल्याने एजंटांची संख्या सहावर गेली आहे. म्हैसाळ प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक दीपा काळे यांनी अटकेत असलेल्या आरोपी डॉक्टरांची होमिओपॅथी कौंन्सिलच्या अधिकाऱ्यांसोबत चौकशी केली. या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी काही डॉक्टरांची पोलिसांना माहिती मिळाली असून, त्यांचा शोध सुरू आहे. डॉ. खिद्रापुरे याच्याकडून गर्भपात करणाऱ्या महिला रुग्णांची पोलिसांना यादी मिळाली असून, त्यांचीही चौकशी सुरू आहे. याप्रकरणातील अकरा आरोपींना अटक झाली असून, आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत. डॉक्टर पत्नीची मुक्ततापोलिसांनी डॉ. खिद्रापुरे याच्या डॉक्टर पत्नीस ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, तिने पतीच्या कृत्यात सहभागी असल्याचे नाकारले आहे. यामुळे पोलिसांनी डॉक्टर पत्नीची मुक्तता केली. डॉ. खिद्रापुरे याने कर्नाटकातील कागवाड, विजापूरसह आणखी काही ठिकाणी गर्भलिंग चाचणी करून म्हैसाळ येथे गर्भपात करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉ. खिद्रापुरे हा मद्याच्या नशेत रात्रीच्या वेळी गर्भपात करीत होता. पतीच्या कृत्यात सहभागी असल्याचा पुरावा मिळाल्यास डॉक्टर पत्नीविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर ताब्यातअटकेत असलेला खिद्रापुरे व त्याच्या एजंटाच्या चौकशीतून शिरोळ तालुक्यातील एका डॉक्टरचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी शिरोळ पोलिसांची मदत घेऊन या डॉक्टरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरु होती. आतापर्यंतच्या तपासात कर्नाटक व कोल्हापूर जिल्हा ‘कनेक्शन’ स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकातील एका महिला डॉक्टरलाही ताब्यात घेतले होते, पण चौकशी करुन तिला सोडून देण्यात आले. शिरोळच्या या डॉक्टरचा नेमका काय सहभाग आहे, याची माहिती सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. वकीलपत्र घेऊ नका : महिला काँग्रेसची मागणीमहिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिरजेत वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन म्हैसाळ प्रकरणातील आरोपी डॉ. खिद्रापुरे व त्याच्या साथीदारांचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी केली. प्रतीक्षा सोनवणे, सुनंदा खराडे, लता कोळी, गौराबाई भोरे, शेषाबाई कदम, शोभा झांबरे, विमल कदम, शिवलीला छलवादी, सुशीला दोडमणी यांनी वकील संघटनेचे अ‍ॅड. एम. ए. शेख, अ‍ॅड. सी. ए. पाटील, अ‍ॅड. एस. के. घेवारे, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. राजू शिरसाट यासह पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले.