शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी दोन मंत्र्याना दारोदारी फिरावे लागले

By admin | Updated: November 4, 2015 00:10 IST

संजू परब यांची टीका : युतीचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात

सावंतवाडी : दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत दोन मंत्र्यांना दारोदारी फिरावे लागले, आमची सत्ता आली नाही, पण मतांची टक्केवारी वाढली असून युतीचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. पण आम्ही विरोधी पक्षातच बसण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे, असे मत दोडामार्ग नगरपंचायतचे काँग्रेसचे प्रचारप्रमुख संजू परब यांनी मांडले. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी गुरू सावंत, रवींद्र म्हापसेकर, रवींद्र मडगावकर उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब म्हणाले, दोडामार्ग नरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले असून, विधानसभा निवडणुकीत दोडामार्गमध्ये आमची टक्केवारी अवघी १५ टक्के होती. ती नगरपंचायत निवडणुकीत ४९ टक्क्यावर गेली आहे. काँग्रेसचे दोन उमेदवार अवघ्या १ व १५ मतांनी पडले अन्यथा दोडामार्गमध्ये वेगळे चित्र पाहता आले असते, असेही परब म्हणाले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला. मात्र, शिवसेना-भाजप युतीचे शिक्षणमंत्री तसेच पालकमंत्री आमदार माजी आमदार हे दोडामार्गमध्ये ठाण मांडून होते. प्रचार सभा घेतल्या. पालकमंत्र्यांनी तर दारोदारी जाऊन प्रचार केला. तसेच पैशाचा मोठ्या प्रमाणात वापरही केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्येक घराघरातून एका माणसाला नोकरीचे आमिष दोडामार्गच्या निवडणुकीत दाखवले. त्यांनी दिलेले आमिष आम्ही पूर्ण करून घेऊच, असे सांगत तावडेंचे विधान निवडणुकीच्या काळात चुकीचे आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपने पूर्णपणे सत्तेचा वापर केला. अनेक ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दादागिरी केली. काँग्रेस उमेदवारांच्या घरात जाऊन घुसत होते. हे योग्य नाही. प्रशासनाच्या दादागिरीचा हा विजय असल्याचेही परब म्हणाले. मात्र, असे असले तरी युतीतील काही नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क केला असून, जर नगराध्यक्ष आमचा बसला नाही, तर आम्ही तुमच्याकडे येऊ, असे भ्रमणध्वनीवरून आम्हाला सांगितल्याचा दावा, संजू परब यांनी केला आहे. (प्रतिनिधी)केसरकर म्हापसेकरांमुळे तरलेपालकमंत्री दीपक केसरकर यांना घरोघरी जाऊन प्रचार करावा लागला. त्यानंतरच कुठे तरी शिवसेनेच्या पाच जागा आल्या. पण यात केसरकरांपेक्षा राजन म्हापसेकर यांचा वाटा महत्त्वाचा असून ते जर दोडामार्गमध्ये नसते, तर चित्र उलटे झाले असते. पालकमंत्र्यांना तोंड दाखवणे मुश्किल झाले असते, असा अंदाज परब यांनी व्यक्त केला.