शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात दोन लाखांची औषधे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST

शिराळा : शिराळा येथे एका औषध दुकानातून चक्क दीड ते दोन लाखांची औषधे चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...

शिराळा

: शिराळा येथे एका औषध दुकानातून चक्क दीड ते दोन लाखांची औषधे चोरून नेल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी औषधांसह सीसीटीव्हीचा डीव्हीआरही नेला आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून शिराळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

येथील सोमवार पेठ येथे विद्युत कार्वेकर यांच्या मालकीचे कार्वेकर मेडिकल दुकान आहे. रविवारी रात्री काम संपल्यावर त्यांनी दुकान बंद केले. सोमवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या दाराची कडी उचकटल्याचे दिसले. यावेळी त्यांनी दरवाजा उघडून दुकानात पाहिले असता औषधांचे मोकळे बॉक्स आढळून आले. याचबरोबर पैशाच्या ड्राॅवरमधून सुमारे तीन हजार रुपयांची रोख रक्कम व सीसीटीव्हीचा डीव्हीआर वायर तोडून चोरून नेला आहे.

या चोरीबाबत मुख्य बाजारपेठेतील विविध दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. सांगलीहून ठसेतज्ज्ञांना बोलविण्यात आले होते. श्वानपथकाद्वारेही चोरट्यांचा शोध घेण्यात आला. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार वायदंडे हे तपास करीत आहेत.

चौकट

सातत्याने चोरीच्या घटना

यापूर्वी १३ जून २०२० रोजी कार्वेकर मेडिकलमध्ये चोरी करून ५ हजार रुपये चोरट्यांनी नेले होते. तसेच ४ डिसेंबर रोजी संदीप शेटे यांच्या मोबाईल दुकानातून २ लाख ४२ हजार रुपये किमतीचे २० ते २२ मोबाईल चोरट्यानी चोरून नेले होते. सध्या प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानापुरतेच सीसीटीव्ही कॅमेरे ठेवल्याने फुटेज तपासताना पोलिसांना अडचण येत आहे.

फोटो-०४शिराळा१