शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या ट्रॉलीला धडकून दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:27 IST

विटा : रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्राॅलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने दोघे ठार झाले. वीरेंद्र परशुरामजी वलथरे (सध्या रा. ...

विटा : रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्राॅलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने दोघे ठार झाले. वीरेंद्र परशुरामजी वलथरे (सध्या रा. लेंगरे, ता. खानापूर, मूळ रा. हुलबीतुला, ता. सालेकसा, जि. गोंदिया) आणि राधेश्याम लोकचंद तुमसरे (सध्या रा. लेंगरे, ता. खानापूर, मूळ रा. रिसामा, ता. आमगाव, जि. गोंदिया), अशी त्यांची नावे आहेत. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जोंधळखिंडी (ता. खानापूर) येथे घडली.

वीरेंद्र वलथरे आणि राधेश्याम तुमसरे यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील काही युवक सध्या लेंगरे येथे मजुरीसाठी वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांचा मित्र दिनेश वलथरे कऱ्हाड येथून लेंगरेला येणार होता. त्याला विट्यातून आणण्यासाठी रात्री साडेनऊच्या सुमारास वीरेंद्र आणि राधेश्याम दुचाकीने (क्र. एमएच ३५ एबी ६२६८) विट्याकडे निघाले होते. त्यावेळी जोंधळखिंडीजवळ रस्त्यावर अंधारात उसाची ट्राॅली उभी केली होती. या ट्राॅलीला रिफ्लेक्टर नसल्याने ती दुचाकीस्वारांच्या लक्षात आली नाही. तिच्यावर दुचाकी पाठीमागून धडकली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच वीरेंद्र यांचा मृत्यू झाला. राधेश्याम यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचाही मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी ट्रॅक्टर चालक प्रकाश हरिबा कुलाळ (रा. खंडनाळ, ता. जत) याच्याविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.