शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव तालुक्यात वीज कोसळून दोन ठार

By admin | Updated: May 12, 2017 19:26 IST

वडगाव (ता. तासगाव) येथे शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून दोन शेतमजूर जागीच ठार झाले. शंकर कोंडी पाटील (वय ६०) आणि अरविंद राजाराम बिसले (४५) अशी त्यांची नावे आहेत.

तासगाव : वडगाव (ता. तासगाव) येथे शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून दोन शेतमजूर जागीच ठार झाले. शंकर कोंडी पाटील (वय ६०) आणि अरविंद राजाराम बिसले (४५) अशी त्यांची नावे आहेत.शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तासगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वडगाव येथे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी ओढ्यालगत झाडे तोडण्याचे काम सुरू होते. गावातील पाच शेतमजूर या कामावर होते. वादळी वारा आणि विजांचा कडकडाट सुरु झाल्यानंतर तीन मजूर झाडापासून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी बाजूला गेले, तर शंकर पाटील आणि अरविंद बिसले झाडापासून बाजूला जात असतानाच वीज कोसळली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच वडगावसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिस पाटलांनी पोलिसांना दिली. त्यानंतर रात्री उशिरा तासगाव पोलिसांत नोंद करण्यात आली.दैव बलवत्तर म्हणून तिघे बचावलेझाडाचे तोडकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाच शेतमजूर होते. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर यातील तिघे शेतमजूर तातडीने झाडापासून काही अंतरावर बाजूला गेले. इतक्यात झाडावर वीज कोसळली आणि झाडाखाली असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून इतर तीन मजुरांचा प्राण बचावल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.घरची परिस्थिती हलाकीचीवीज कोसळून ठार झालेल्या दोघाही मजुरांच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे. शंकर पाटील यांच्या पश्चात पत्नी असून त्यांना मुले नाहीत. अरविंद बिसले यांच्याही घरची परिस्थिती बेताची असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि शिक्षण घेणारी दोन मुले आहेत. या घटनेनंतर वडगावात हळहळ व्यक्त होत होती