शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दोन ‘जलदूत’ आज लातूरला धावणार

By admin | Updated: April 19, 2016 00:57 IST

जलवाहिनीचे काम पूर्ण : आठवी पाणी एक्स्प्रेस लातूरला रवाना

मिरज : मिरजेतून सोमवारी सायंकाळी दहा टॅँकरची आठवी ‘जलदूत’ एक्स्प्रेस लातूरला रवाना झाली. लातूरला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था पूर्ण झाल्याने मंगळवारी दहा व पंचवीस टॅँकरच्या दोन जल एक्स्प्रेस साडेसतरा लाख लिटर पाणी घेऊन लातूरकडे धावणार आहेत. दरम्यान, लातूरसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेची जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पाहणी केली. मिरजेतून दहा टॅँकरची आठवी जल एक्स्प्रेस सायंकाळी ५.४० वाजता रवाना झाली. आतापर्यंत लातूरकरांसाठी ४० लाख लिटर पाणी जल एक्स्प्रेसने पोहोचविले आहे. सोमवारी दुपारी आणखी दहा टॅँकरमध्ये पाणी भरण्यास सुरुवात करण्यात आली. ही जल एक्स्प्रेस मंगळवारी रवाना होणार आहे. मिरजेतील जलशुद्धीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंतच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याचा थेट हैदरखान विहिरीत साठा करण्यात येणार असल्याने विहिरीतील पाणी ३५ अश्वशक्ती पंपाद्वारे उपसा करण्यात आले. सोमवारी रात्री थेट नदीतून उपसा केलेले पाणी हैदरखान विहिरीत सोडून २५ अश्वशक्ती पंपाद्वारे २५ टॅँकरमध्ये वितरिकेने भरण्याचे काम सुरू झाले. मंगळवारी दहा व पंचवीस टॅँकरच्या दोन जल एक्स्प्रेस अंदाजे १७ लाख ५०० लिटर पाणी घेऊन लातूरला पाणी पुरवठ्यासाठी धावणार आहेत. (वार्ताहर)हैदरखान विहिरीत पाण्याचे झरे!नदीतील पाण्याचा साठा करण्यासाठी हैदरखान विहिरीतील पाण्याचा उपसा करून तो ओढ्यात सोडण्यात येणार आहे. संपूर्ण पाण्याचा उपसा झाल्यानंतर विहिरीच्या चोहोबाजूंच्या झऱ्यातून पाणी वाहत होते. विहिरीतील शिल्लक पाण्याच्या नमुन्याचीही तपासणी केल्यानंतर नदीचे पाणी विहिरीत सोडण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीलातूरला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी नदीतून पाणी उपशासाठी पूर्ण करण्यात आलेल्या व्यवस्थेची जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पाहणी केली. जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता एस. एल. गरंडे, महापालिकेचे आयुक्त अजिज कारचे, तहसीलदार किशोर घाडगे, ठेकेदार शशांक जाधव, रेल्वे अधिकारी जॉर्ज उपस्थित होते. लातूरसाठी आतापर्यंत रेल्वेच्या ८ खेपांद्वारे ४० लाख लिटर पाणी देण्यात आले आहे. २५ टॅँकरद्वारे लातूरला पाणी देण्याची व्यवस्था पूर्ण झाल्याचेही जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.