शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे एसटी कर्मचारी ‘बेस्ट’च्या सेवेसाठी पुन्हा मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:20 IST

सांगली : मुंबईत बेस्ट उपक्रमासाठी जिल्ह्यातून एसटीचे दोनशे चालक व वाहक रविवारी रवाना झाले. दोन महिन्यांपूर्वीही कर्मचारी गेले होते, ...

सांगली : मुंबईत बेस्ट उपक्रमासाठी जिल्ह्यातून एसटीचे दोनशे चालक व वाहक रविवारी रवाना झाले. दोन महिन्यांपूर्वीही कर्मचारी गेले होते, मात्र त्यातील शंभरावर कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

मुंबईत लोकल सेवा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु झालेली नाही. त्याचा मोठा ताण बेस्ट प्रशासनावर पडत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून एसटी गाड्या व कर्मचाऱ्यांची मागणी बेस्टने केली आहे. त्याला प्रतिसाद देत सांगली, पुणे, जळगाव आणि नांदेड विभागातून एसटी व कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. २३ डिसेंबरपर्यंत ते मुंबईत सेवा देतील. गेल्यावेळी या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची चांगली व्यवस्था न झाल्याने बराच दंगा झाला होता. आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी लॉज उपलब्ध केले आहेत. जेवणाची जबाबदारी बेस्ट किंवा एसटीने घेतलेली नाही. त्याऐवजी दररोजच्या दोनवेळच्या जेवणासाठी २२५ रुपयांचा भत्ता दिला आहे.

सांगली जिल्ह्यातून रविवारी (दि. ६) १०० चालक, १०० वाहक व सहा पर्यवेक्षक दर्जाचे अधिकारी मुंबईसाठी रवाना झाले. ते मुंबईत प्रतिक्षानगर आगारात काम करतील. सांगली आगारातून ४०, मिरजेतून ४० व अन्य आगारांतून १२० असे २०० चालक-वाहक गेले आहेत. सोमवारी (दि. ७ ) पहाटे पाच वाजल्यापासून त्यांची ड्युटी सुरू होईल.

चौकट

कोरोनाच्या सावटाखाली काम करणार

गेल्यावेळी मुंबईत सेवा देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे या खेपेस काळजी घेतली आहे. ५५ वर्षांखालील कर्मचाऱ्यांनाच पाठविले आहे, शिवाय ते निर्व्यसनी असतील याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. राहण्यासाठी हॉलऐवजी लॉजमध्ये स्वतंत्र खोल्या दिल्या असून जेवणाची निवड कर्मचाऱ्यांवरच सोपविली आहे.