शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

शिरटे येथे घरजागेच्या वादातून दोन कुटुंबांत मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST

इस्लामपूर : शिरटे (ता. वाळवा) येथे घरजागेच्या कारणावरून एकाच भावकीतील दोन कुटुंबांमध्ये मारामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूंचे चौघे जखमी ...

इस्लामपूर : शिरटे (ता. वाळवा) येथे घरजागेच्या कारणावरून एकाच भावकीतील दोन कुटुंबांमध्ये मारामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूंचे चौघे जखमी झाले. हा प्रकार गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला. मारामारीत लोखंडी सळी आणि लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

या मारामारीत शंकर भीमराव सूर्यगंध, सीमा शंकर सूर्यगंध, दिग्विजय अशोक सूर्यगंध, शकुंतला अशोक सूर्यगंध असे चौघे जखमी झाले आहेत. शंकर सूर्यगंध यांनी दिलेल्या फिर्यादीत दोन्ही कुुटुंबांमध्ये घरजागेच्या कारणातून वाद आहे. त्या वादातून सकाळी नऊच्या सुमारास शकुंतला अशोक सूर्यगंध, विठ्ठल निवृत्ती सूर्यगंध, दिग्विजय अशोक सूर्यगंध या तिघांनी मिळून मारहाण केल्याचे म्हटले आहे. विठ्ठल सूर्यगंध याने लोखंडी सळीने शंकर सूर्यगंध यांच्या हातावर मारून त्यांना जखमी केले; तर इतरांनी त्यांची पत्नी सीमा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली.

दिग्विजय सूर्यगंध यांनी दिलेल्या फिर्यादीत शंकर सूर्यगंध, सीमा सूर्यगंध, सुयोग शंकर सूर्यगंध, सुमित शंकर सूर्यगंध या चौघांनी फिर्यादीसह त्याच्या आईला मारहाण केली. यामध्ये लोखंडी पाईपने दिग्विजय सूर्यगंध याच्या कपाळावर मारून त्याला जखमी केले; तर शकुंतला यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.