शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’ची दोन कोटींची साखर जप्त

By admin | Updated: July 19, 2014 23:50 IST

गोदाम सील : ‘उत्पादन शुल्क’ची कारवाई

मिरज : केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची सुमारे दोन कोटी रुपये किमतीची १३ हजार साखर पोती आज, शनिवारी जप्त केली. १ कोटी ५४ लाख रुपये उत्पादन शुल्क वसुलीसाठी कारखान्यातील गोदामाला सील ठोकण्यात आले. वसंतदादा कारखान्याने एप्रिल व जून महिन्यांत विक्री झालेल्या साखरेचे १ कोटी ५४ लाख रुपये उत्पादन शुल्क भरलेले नाही. उत्पादन शुल्क वसुलीसाठी कारखाना व्यवस्थापनाने प्रतिसाद दिला नसल्याने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सहायक आयुक्त शुभेंद्र यांनी साखरेची पोती जप्त करण्याचे आदेश दिले. अधीक्षक ए. बी. पाटील, निरीक्षक एम. बी. कुलकर्णी यांच्या पथकाने आज दुपारी कारखान्याच्या गोदामातील १३ हजार ३९० पोती जप्त केली. साखर ठेवलेल्या १५ क्रमांकाच्या गोदामाला उत्पादन शुल्कचे सील ठोकण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या साखरेची किंमत १ कोटी ८७ लाख रुपये आहे. जप्तीच्या कारवाईमुळे साखर परत मिळविण्यासाठी कारखान्याला १ कोटी ५४ लाख रुपये उत्पादन शुल्क, दंड व या रकमेवर १८ टक्के व्याज भरावे लागणार आहे. साखर कारखान्यात उत्पादित झालेल्या साखरेच्या विक्रीवर कारखाना व्यवस्थापनाने मे महिन्यातील साखर विक्रीचे उत्पादन शुल्क जमा केले; मात्र एप्रिल व जून महिन्यांतील मोठ्या प्रमाणात झालेल्या साखर विक्रीचे शुल्क भरले नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)