आष्टा : शिगाव (ता. वाळवा) येथे गावठी हातभट्टी दारू वाहतूकप्रकरणी आष्टा पोलिसांनी विवेक गणपती मस्के (वय १९) व रोहित मंगेश माने (वय २२, रा. चांदोली वसाहत, बागणी, मुळगाव सातवे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांना पकडले. त्यांच्याकडून ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अभिजीत धनगर, नितीन पाटील, अमोल शिंदे, सुरज थोरात, अभिजित नायकवडी खासगी वाहनाने अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी गस्तीवर हाेते. यावेळी शिगाव येथे मुख्य मार्गावरून गावठी हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. यात विवेक गणपती मस्के व रोहित मंगेश माने यांच्याकडून ४ हजार ५०० रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू व ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा ३९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.