शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक होसमणींच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: February 4, 2016 01:16 IST

गूढ उकलले : आर्थिक वादातून खून केल्याची गुन्हेगारांची कबुली

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील उद्योजक भास्कर होसमणी यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला बुधवारी यश आले. या खूनप्रकरणी संतोष दामाजी धनवडे (वय ३४, रा. वसंतदादा औद्योगिक वसाहत, सांगली) व प्रमोद ईश्वर करजगार (२७, रा नवजीवन कॉलनी, अहिल्यानगर, सांगली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार व ‘नाजूक’ कारणावरून खून केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात होसमणी यांचा सांगली-कोल्हापूर रस्त्याकडे जाणाऱ्या धामणी रस्त्यावरील म्हसोबा मंदिरासमोर बॅट व दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. होसमणी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून निघाले होते. त्यानंतर ते संपत चौकातील एका हॉटेलमागे गेले होते. तेथून ते एका व्यक्तीसोबत गेल्याचे अनेकांनी पाहिले होते; पण ती व्यक्ती कोण याचा उलगडा होत नव्हता. माधवनगर रस्त्यावरील मीरा हौसिंग सोसायटीसमोर असलेल्या एका वाहन शोरूमजवळ रस्त्याकडेला असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले होते. अत्यंत गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक बनलेल्या या खुनाचा उलगडा करण्याचे आव्हान सांगली ग्रामीण पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक विश्वनाथ घनवट यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. घनवट यांनी खुनाच्या तपासासाठी स्वतंत्र पथके तयार केली. अखेर या खुनाचा गुंता सोडविण्यात घनवट व त्यांच्या पथकाला यश आले. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संतोष धनवडे व प्रमोद करजगार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी खुनाची कबुली दिली. होसमणी यांच्या कारखान्याशेजारीच धनवडे हा कँटीन चालवता होता. त्याच्या कँटीनमध्ये प्रमोद करजगार कामाला होता. धनवडे याने होसमणी यांच्याकडून पन्नास हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी होसमणी यांनी तगादा लावला होता. पैशापोटी त्यांनी धनवडेची मोटारसायकलही आणली होती. मात्र धनवडे याने त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल परत नेली होती. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. पैसे परत करता येत नसतील तर बायकोला माझ्याकडे पाठव, अशा भाषेत होसमणी यांनी धनवडेला सुनावले होते. त्याचा राग मनात धरून धनवडे याने त्यांना धामणी रस्त्यावर नेऊन प्रमोदच्या साथीने खून केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या दोन्ही संशयित आरोपींना पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या कारवाईत निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, कर्मचारी दीपक पाटील, शंकर पाटील, नारायण निकम, विनोद चव्हाण, कुलदीप कांबळे, संदीप मोरे, विजयकुमार पुजारी, किशोर काबुगडे, सीमा धनवडे, योगीता लोखंडे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)