शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत व्यापाऱ्यांकडून दोघांचे अपहरण; बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:25 IST

आटपाडी : सोन्याची तस्करी करताना ८२ लाख रुपयांचे अडीच किलो चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरुन बनपुरी (ता. आटपाडी) येथील दोघांचे ...

आटपाडी : सोन्याची तस्करी करताना ८२ लाख रुपयांचे अडीच किलो चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरुन बनपुरी (ता. आटपाडी) येथील दोघांचे व्यापाºयांनीअपहरण करुन त्यांना बेदम मारहाण केली. मुंबई पोलीस असल्याची बतावणी करून दोन आलिशान मोटारीतून आलेल्या नऊजणांनी एका महिलेलाही मारहाण केली आहे. आटपाडी पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईलने पाठलाग करून, अपहरण केलेल्यांची सुटका केली.याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात अपहरण केलेल्या अमोल ब्रह्मदेव यमगर आणि अजित ब्रह्मदेव यमगर व त्यांची आई अनुसया यमगर यांनी फिर्याद दिली आहे. विकास कदम (रा. कौठुळी, ता. आटपाडी), मदन (पूर्ण नाव माहीत नाही, रा. कौठुळी, ता. आटपाडी), कैलास वस्ताद गोरड (रा. वीरकरवाडी, ता. माण), अक्षय गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर), तुषार चिमाजी वीरकर (रा. वीरकरवाडी, ता. माण), श्रीनाथ ऊर्फ श्रीकांत धायगुडे (रा. बलवडी, ता. खानापूर), संजय महादेव पुकळे (रा. बनपुरी), महेश जाधव (रा. बेणापूर, ता. खानापूर), अतुल जाधव (रा. बेणापूर, ता. खानापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोलकात्ता येथील काही व्यापाºयांचे सोने काही दिवसांपूर्वी प्रदीप पाटील (रा. बनपुरी, ता. आटपाडी) या कामगाराच्या ताब्यातून चोरीस गेले होते. हे सोने अमोल यमगर व अजित यमगर यांनी घेतल्याचा संशय संबंधित व्यापाºयांना होता. या वादातून बुधवारी दुपारी आपण मुंबई पोलीस असल्याची बतावणी करत दोन आलिशान मोटारीतून नऊजण आटपाडीत आले. त्यांनी बनपुरीतून अमोल व अजित यमगर यांना दमदाटी करीत ताब्यात घेतले. यावेळी अमोल व अजित यांची आई अनुसया यमगर यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, अपहरणकर्त्यांनी त्यांनाही मारहाण केली. यानंतर अपहरणकर्ते अमोल व अजित यांना घेऊन तडवळे येथील एका शेतात आले. तेथे चोरीचे सोने परत देण्याची मागणी करीत अजित व अमोल यांना बेदम मारहाण केली.दरम्यान, याबाबतची माहिती अनुसया यमगर यांनी आटपाडी पोलिसांना दिली. आटपाडी पोलिसांनी तात्काळ खासगी वाहनाने तडवळे येथे जाऊन अपहरणकर्त्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान,अमोर याला तडवळे येथील शेतात सोडून अपहरणकर्ते अजित यमगर यांना घेऊन दोन वाहनांसह पळून जात होते.पोलिसांनी तडवळे ते साई मंदिरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. साईमंदिराजवळ एक वाहन रोखण्यात पोलिसांना यश आले. या वाहनात असलेले अजित यमगर यांची सुटका करून चौघा अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले, तर दुसºया वाहनातील अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी झाले. अपहरणकर्त्यांच्या मारहाणीत बेशुद्ध झालेल्या अजित यमगर यांना पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. अपहरणकर्त्यांकडील आलिशान मोटार (क्र. एमएच ०६ एडब्ल्यू ६४६६) ताब्यात घेतली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक सुधाकर देढे करीत आहेत.