शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बिळाशी येथे बारा लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:04 IST

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील विजय श्रीपती धस यांच्या घरी चोरी झाली असून, सुमारे चाळीस तोळे सोने व ५० हजार रुपये रोकड चोरट्याने लंपास केली आहे. चोरट्याने धस यांच्या घरात असलेले कपाट पेटवून देत किमती साड्या, कपड्यांचे मोठे नुकसानही केले. याप्रकरणी धस यांनी राहुल कल्लाप्पा वग्गे (मूळ गाव लिंबी, ...

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील विजय श्रीपती धस यांच्या घरी चोरी झाली असून, सुमारे चाळीस तोळे सोने व ५० हजार रुपये रोकड चोरट्याने लंपास केली आहे. चोरट्याने धस यांच्या घरात असलेले कपाट पेटवून देत किमती साड्या, कपड्यांचे मोठे नुकसानही केले. याप्रकरणी धस यांनी राहुल कल्लाप्पा वग्गे (मूळ गाव लिंबी, चिंचोळी, ता. दक्षिण सोलापूर) या घरगड्यावर संशय व्यक्त केला आहे.बिळाशी ते कुसाईवाडीदरम्यान परीट वस्तीजवळ विजय धस यांचा बंगला आहे. तेथेच त्यांची मोठी शेतीवाडी आहे. ते या परिसरातील प्रगतशील शेतकरी आहेत. पत्नी आनंदी, आई ताराबाई यांच्यासह सर्व कुटुंबीय पंधरा दिवसांपूर्वी ठाणे (मुंबई) येथे विजय धस यांच्या भावाकडे गेले होते. घरगडी राहुल वग्गे हा एकटाच घरी होता. गेले तीन वर्षे तो त्यांच्याकडे काम करीत असल्याने त्याच्यावर धस यांचा विश्वास होता. ठाण्याला जाताना धस यांनी गावातील महादेव साठे यांच्या खानावळीत त्याची जेवणाची सोय केली होती. शुक्रवार, दि. २२ जून रोजी रात्री ९.१५ पर्यंत राहुल हा धस कुटुंबीयांच्या संपर्कात होता. त्यानंतर त्याचा फोन बंद होता. बिळाशी येथील घरगुती खानावळीत जेवायला जाणारा राहुल शनिवारी दुपारपर्यंत न आल्याने, तसेच त्याचा फोन लागत नसल्याने खानावळीचे मालक महादेव साठे यांनी धस यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली. यावेळी विजय धस यांनी त्यांना घरी अथवा शेतात जाऊन पाहण्यास सांगितले. साठे यांनी धस यांच्या शेतात राहुलचा शोध घेतला; पण तो दिसला नाही. यानंतर ते धस यांच्या घरी गेले असता तेथेही तो नव्हता. परंतु, साठे यांना धस यांचे घर उघडे असल्याचे दिसले, तसेच खोलीतील साहित्य जळाल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी तातडीने धस यांना फोनवरून याची माहिती दिली.धस यांनीही लगेचच खुजगाव (ता. शिराळा) येथे मुलगी ज्योती व जावई शंकर सावंत यांना फोन करून घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. रात्री दहा वाजता ज्योती व शंकर सावंत बिळाशी येथे आले. यावेळी त्यांना धस यांच्या घराचा दरवाजा फरशी घालून तोडल्याचे दिसून आले. बेडरूममधील कपाटे उघडलेली व त्यामधील साहित्य विस्कटलेले दिसून आले. तसेच एक कपाट पेटवून देऊन कपडे, साड्या जाळल्याचे आढळले. याप्रकरणी धस यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.घरगडी दुचाकीसह गायबघरगडी राहुल हा मोटारसायकलसह (एमएच ०४ सीएफ ५०६४) गायब होता. मुलगी ज्योती हिने सर्व माहिती विजय धस यांना कळविल्यानंतर रविवारी सकाळी धस कुटुंबीय बिळाशीला परतले. त्यांनीही राहुल वग्गे याचा शोध घेतला; पण तो सापडला नाही.